Headlines

‘मी हजारो मुलींसोबत रिलेशनमध्ये पण कधी…’, सलमान खानचे वक्तव्य चर्चेत

[ad_1]

Salman Khan On Personal Life : बॉलिवूड मोस्ट एलिजेबल बॅचलर म्हणून अभिनेता सलमान खानला ओळखले जाते. सलमानने वयाची पन्नाशी ओलांडली असली तरी अद्याप तो अविवाहित आहे. सलमान खान कधी लग्न करणार? हा प्रश्न अनेकदा त्याला विचारण्यात आला आहे. पण त्यावर उत्तर देण्यास त्याने कायमच टाळाटाळ केली आहे. सलमान खानचे नाव आतापर्यंत अनेक अभिनेत्रींशी जोडण्यात आलं आहे. पण सलमानने कधीही प्रेमाची किंवा लग्नाची कबुली दिलेली नाही. तो कधीही त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल भाष्य करत नाही. त्यातच आता सलमानचे एक वक्तव्य चर्चेत आले आहे.

सलमान खानचे वैयक्तिक आयुष्य कायमच चर्चेचा भाग असते. सलमान खानने आतापर्यंत अनेक अभिनेत्रींना डेट केले आहे. सलमान खानचे सर्वप्रथम नाव ८० च्या दशकात मिस इंडिया हा खिताब मिळवणारी अभिनेत्री संगीता बिजलानीबरोबर जोडले जाते. या दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा बॉलिवूडमध्ये फार गाजल्या. जवळपास १० वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पण ऐनवेळी त्यांचं लग्न रद्द करण्यात आलं. 

यानंतर सलमानचे नाव पाकिस्तानी अभिनेत्री सोमी अलीशी जोडले जाते. पण काही काळानंतर सोमी अली आणि सलमानचाही ब्रेकअप झाला. त्यानंतर सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचं प्रेमप्रकरण बॉलिवूडमध्ये सर्वाधिक गाजलं. यासोबतच सलमान कतरिना कैफ, झरीन खान, रोमानियन अभिनेत्री लुलिया वंतूर या अभिनेत्रींसोबतही रिलेशनमध्ये होता असे बोललं जातं. पण त्याने कधीच यावर कोणतेही भाष्य केले नाही. 

“मी कधीही कोणाला एकटं सोडलेलं नाही”

सलमान खान आणि संगीता बिजलानी यांचा ब्रेकअप झाल्यानंतर एकदा एका मुलाखतीत त्याला त्याच्या खासगी आयुष्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. 1990 मध्ये मायापुरी मॅगझीनच्या पत्रकाराने सलमानला संगीतावरुन प्रश्न विचारला होता. त्यावर सलमान खान चांगलाच भडकला होता. “माझे वैयक्तिक आयुष्य फक्त माझे आहे. यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार मी कोणालाही दिलेला नाही. मी आतापर्यंत हजारो मुलींसोबत रिलेशनमध्ये राहिलो असेल. पण मी कधीही कोणाला एकटं सोडलेलं नाही. मी माझे नातं शेवटपर्यंत टिकवलं”, असे सलमान खान म्हणाला होता. 

त्याला याच मुलाखतीदरम्यान तू लग्न कधी करणार, असे विचारले होते. त्यावर सलमानने “मी पुढचे दोन वर्ष लग्न करणार नाही. कारण मला माझ्या करिअरवर लक्ष केंद्रीत करायचे आहे”, असे म्हटले होते. या काळात सलमानने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. सलमान खान साजन, सनम बेवफा, अंदाज अपना-अपना, बीवी नंबर वन आणि हम दिल दे चुके सनम या चित्रपटात झळकला. त्याचे हे सर्व चित्रपट चांगलेच गाजले. या चित्रपटांनी तगडी कमाई केली होती.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *