Headlines

bjp mp kapil patil replied to supriya sule on bhartiya janata loundry statement spb 94

[ad_1]

रविवारी पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी “भाजपा हा आधी पक्ष होता आता भारतीय जनता लाँड्री झाला आहे”, असे विधान केले होते. सुप्रिया सुळेंच्या या वक्तव्यावर भाजपा खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी प्रत्त्युत्तर दिले आहे. आपण मागे काय केलं, याचा विचार करूनच वक्तव्य करायला हवे, असे ते म्हणाले.

हेही वाचा – Andheri Bypoll: निवडणूक बिनविरोध करण्याच्या राज ठाकरेंच्या पत्रावर BJP उमेदवार मुरजी पटेल म्हणाले, “मी अंधेरीचा…”

काय म्हणाले कपिल पाटील?

“आपल्याला आठवत असेल तर २०१९ च्या निवडणुकीला उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या भ्रष्टाचाराचे पुस्तक छापली होती. भर सभेत त्यांनी ते पुस्तक दाखवले होते. आता दोघेही एकत्र आले आहेत. याचा अर्थ आम्ही काय घ्यायचा? खरं तर राजकारणात अशी स्थित्यंतरं येत असतात, जो-तो आपल्या सोयीप्रमाणे राजकारण करत असतो. त्यामुळे आपण मागे काय केलं, याचा विचार करूनच वक्तव्य करायला हवे”, असे प्रत्युतर कपिल पाटील यांनी सुप्रिया सुळे यांना दिले आहे.

दरम्यान, यावेळी त्यांनी ‘सामना’तून करण्यात आलेल्या टीकेलाही उत्तर दिले. “एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेली भूमिका ही त्यांची होती. ही भाजपाची भूमिका नव्हती. त्यामुळे भाजपा त्यांचा काँट्रॅक्ट किलर म्हणून वापर करते, असा आरोप करणं योग्य नाही”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – Andheri by-election : इतका छळवाद झाला तेंव्हा राज ठाकरे गप्प होते, आता…; अरविंद सावंतांचं विधान!

दरम्यान, काल (रविवारी) पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी महागाई आणि बेरोजगारीवरून भाजपावर जोरदार टीका केली होती. तसेच त्यांनी इतर पक्षातील भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांना भाजपात घेण्यावरून टोला लगावला होता. “भाजपा हा आधी पक्ष होता आता भारतीय जनता लाँड्री झाला आहे”, असे त्या म्हणाल्या होत्या.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *