Headlines

Diwali 2022: वास्तुशास्त्रानुसार अशी करा दिवाळीची साफसफाई, नाहीतर लक्ष्मी होईल नाराज

[ad_1]

Diwali Vastu Tips : दिवाळीचा (Diwali 2022) सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यंदा दिवाळी 21 ऑक्टोबर पासून 26 ऑक्टोबरपर्यंत आहे. दिव्यांची आणि आनंदाची उधळण करणारा हा सण…असा हा सण प्रत्येकाच्या आयुष्यासाठी शुभ व्हावा म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार अनेक गोष्टींची तुम्ही काळजी घेतल्यास तुम्हाला फायदा होईल. वसुबारस (Vasubaras 2022),धनत्रयोदशी (Dhantrayodashi 2022), पहिली आंघोळ, लक्ष्मीपूजन (Lakshmi Pujan 2022), पाडवा (Padwa 2022) आणि भाऊबीज (Bhaubeej 2022) असा हा दिवाळीचा सण मोठ्या उत्साहाता देशभरात साजरा होतो. दिवाळीत फराळ, सजावटीसोबतच घराची साफसफाई महत्त्वाची आहे. 

नकारात्मकता दूर करा!

जर तुम्ही घरातील साफसफाई (Diwali Cleaning 2022) अजून केली नसेल तर ती कशी करायची काय घरातून फेकून नये किंवा कुठल्या वस्तू घरात ठेवू नये याबद्दल ज्योतिषशास्त्र आणि वास्तूशास्त्रानुसार काय सांगण्यात आलं आहे. त्याबद्दल आज जाणून घेणार आहोत. या गोष्टींची काळजी घेतल्यास तुमच्या घरातील नकारात्मकता दूर होईल आणि माता लक्ष्मी प्रसन्न होईल.  (Diwali Cleaning 2022 and Diwali Vastu Tips nmp)

‘या’ वस्तू घरात ठेवू नका!

खराब वस्तू
जुने कपडे
तुटलेली भांडी
जुनी आणि साचलेली घाण
देवाच्या तुटलेल्या मूर्ती किंवा फोटो
घराच्या ईशान्य कोपऱ्यात कोणतीही धारदार किंवा तुटलेली वस्तू ठेवू नका
रात कोणतेही हिंसक प्राणी किंवा नकारात्मक फोटो ठेवू नका

‘या’ वस्तू कधी फेकू नका!

जुनी नाणी
जुना झाडू
मोरपंख 
शंख 

‘स्वच्छता जेथे जेथे लक्ष्मी सदैव नांदे तेथे’

दिवाळी म्हटलं म्हणजे घरी लक्ष्मीचे आगमन होणार. असं म्हटलं जातं की, ‘स्वच्छता जेथे जेथे लक्ष्मी सदैव नांदे तेथे’. मग जर तुमच्या घरात सदैव लक्ष्मी नांदली पाहिजे तर चला लागा पटकन साफसफाईला. मात्र तुम्हाला माहिती आहे का? घरात दिवाळीची साफ- सफाई करताना कुठून सुरुवात करायला हवी ते…? तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, कुठल्या दिशेने साफसफाई सुरु करायची ते…

‘या’ दिशेने सुरु करा साफसफाई

ज्योतिषशास्त्रानुसार ईशान्य कोपऱ्यापासून साफसफाई सुरुवात करणे शुभ मानले जाते. कारण वास्तूशास्त्रानुसार घरातील ईशान्य दिशा देवतांची दिशा आणि कुबेराची दिशा मानली जाते. त्यामुळे घरात दिवाळीची साफसफाई करताना ईशान्य कोपऱ्यापासून करावी. त्यामुळेयादिशेला कुठलीही अडगळ ठेवू नये, याची विशेष काळजी घ्यावी.

आता ‘या’ दिशेची करा साफसफाई 

पूर्वदिशा ही सुर्योदयाची दिशा आहे. त्यामुळे या दिशेने घरात सदैव सकारात्मक उर्जा येत असते. 

हा घरातील महत्त्वपूर्ण भाग

वास्तु शास्त्रानुसार घरातील मध्य भागाला ब्रम्हस्थान म्हटलं जातं. हा भाग घरातील महत्वाचा भाग मानला जातो. त्यामुळे या भागात कधीही अडगळ ठेवू नये. यासह वजनदार वस्तू जसे कि फर्निचर, कपाट अशा वस्तूही ब्रम्हस्थानावर ठेवू नये. यामुळे घरात वादविवाद होण्याच्या भीती असते. 

ही गोष्ट नक्की करा!

संपूर्ण साफ सफाई झाल्यावर एका भांड्यात पाणी घेऊन त्यात थोडे मीठ मिसळून घरभर शिंपडा. मीठ घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि घरातून काढून टाकते.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *