Headlines

Asia Cup 2022: टी-20 संघातून KL Rahul ला डच्चू? ‘हा’ खेळाडू होणार भारताचा नवा उपकर्णधार?

[ad_1]

Asia Cup 2022: भारताचा स्टार फलंदाज केएल राहुल (KL Rahul) बऱ्याच दिवसांपासून खराब फॉर्मशी झुंजतोय. त्याच्या बॅटमधून धावा निघणं कठीण झालं आहे. त्याचा फॉर्म टीम इंडियासाठी (Team India) प्रमुख समस्या बनलीय. अनेक दिग्गज खेळाडूंनीही त्याच्या धीम्या फलंदाजीवर निशाणा साधलाय. केएल राहुलला संघातून बाहेर बसवण्याची मागणी होत आहे. 

अशातच आता केएल राहुलऐवजी टीम इंडियातल्या एका खेळाडूला उपकर्णधारपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. 

राहलुचा फॉर्म टीमसाठी चिंता
केएल राहुल एशिया कप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध (India vs Pakistan) यावर्षातला पहिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला. पण पहिल्या सामन्यात त्याला खातंही उघडता आलं नाही. हाँगकाँगसारख्या (HongKong) दुबळ्या संघाविरुद्धही धावा करताना त्याला झगडावं लागत होतं. या सामन्यात त्याने 39 धावा केल्या. पण यासाठी त्याला 36 बॉल खेळावे लागले. 

एकवेळ अशी होती जेव्हा रोहित शर्मानंतर (Rohit Sharma) कर्णधारपदासाठी केएल राहुलचं नाव सर्वात आघाडीवर होतं. पण आता टी20 संघातील त्याचं स्थानच धोक्यात आलं आहे.

हा खेळाडू उपकर्णधारपदासाठी दावेदार
एशिया कप स्पर्धेत केएल राहुलच्या बॅटमधून धावा निघाल्या नाहीत तर टीम इंडियातून त्याला बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत केएल राहुलऐवजी अष्टपैलू हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) खांद्यावर उपकर्णधारपदाची धुरा दिली जाऊ शकते. दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन करणारा हार्दिक पांड्या सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. एमएस धोणीनंतर (MS Dhoni) बेस्ट फिनिशर म्हणून त्याची गणना होऊ लागली आहे. 

आयपीएलमध्ये हार्दिकचा बोलबाला
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात आयपीएल 2022 मध्ये गुजरात टायटन्सने (Gujrat Titans) जेतेपदावर नाव कोरलं. फलंदाजीबरोबर गोलंदाजीतही हार्दिक पांड्याने आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. यंदाच्या वर्षी हार्दिक पांड्या टीम इंडियासाठी 14 टी20 सामने खेळला आहे. यात त्याने 34.88 च्या रनरेटने 314 धावा केल्या आहेत. 

एशिया कप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात कट्टर पाकिस्तानविरुद्ध हार्दिक पांड्याने केलेल्या खेळीचं सर्वत्र कौतुक होतंय.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *