Headlines

आलियाची जाऊबाई होऊ पाहणारी Tara Sutaria आता ‘या’ नवख्या क्रिकेटरला करतेय डेट? पाहा Video

[ad_1]

Tara Sutaria: तीन वर्षांपुर्वी तारा सुतारिया (Tara sutaria) ही अभिनेत्री बॉलीवूडमध्ये आली आणि या अभिनेत्रीनं अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. तारा सुतारिया इंडस्ट्रीत येऊन फारच कमी वेळ झाला असला तरी ताराच्या डेटिंगच्या बातम्या मात्र सगळीकडेच जोर धरू लागल्या होत्या. हल्ली सेलिब्रेटी हे सगळीकडेच स्पॉट होत असतात तेव्हा त्यांच्या डेटिंगच्या आणि रिलेशनशिप्सच्या गुपितांचा शोध घ्यायला चाहते अजिबातच मागे पुढे पाहत नाहीत. (bollywood actress tara sutaria spotted with unknown celebrity last night video viral)

ताराचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात ती एका रेस्टोरंटच्या बाहेर स्पॉट झाली पण तिच्या सोबत असणाऱ्या एका अनोळखी व्यक्तीनं मात्र तारापेक्षा चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. तारा सुतारिया सोबत स्पॉट झालेला तो मुलगा अदार जैन (Adar Jain) तर नाही ना असे प्रश्न सगळेच नेटकरी विचारत आहेत. 

अदार जैन हा रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) आतेभाऊ आहे. 

गेल्या काही दिवसांपासून तारा सुतारिया रीमा कपूरच्या (Rima kapoor Jain) मुलाला अदार जैनला डेट करत असल्याची बातमी जोरात पसरत होती. त्यामुळे सर्वत्र त्यांचीच चर्चा होती. परंतु आता या नव्या व्हिडीओमुळे तारा सुतारिया पुन्हा एकदा चर्चत आली आहे. या व्हिडीओ एक मुलगा तारा सुतारियासोबत स्पॉट होतो आहे. त्यातून त्याचा चेहरा नीट दिसत नसल्यामुळे तो कोण आहे यावर सोशल मीडियावर चोरदार चर्चा सुरू झाली आहे.  

हा क्रिकेटर दिपक हुडा आहे की काय असा अंदाज अनेक नेटकऱ्यांनी लावले आहेत. 

तारा ज्या मुलासोबत स्पॉट झाली त्या व्यक्तीने आपला चेहरा हुडी आणि टोपीने झाकलेला होता.ताराचा मिस्ट्री बॉयसोबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा मिस्ट्री बॉय कोण आहे, याचा अंदाज यूजर्स फोटो आणि व्हिडिओंवर कमेंट करत आहेत. तारा मस्त लूकमध्ये दिसली. ती डेनिम आणि ब्लॅक पोल्का डॉट क्रॉपमध्ये दिसली.

तारा नुकतीच ‘एक व्हिलन रिटर्न्स’ (Ek Villain Returns) या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास दाखवू शकला नाही.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *