Headlines

udayanraje Bhosale criticized shivendraraje Bhosale on satara municipal election

[ad_1]

सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीवरुन भाजपा खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यामध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळत आहे. “मिशीला पीळ आणि ताव मारुन काहीही होत नसते” असा चिमटा निवडणूक प्रचारावरुन उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंना काढला आहे. हिंमत असेल तर आजच्या आज पत्रकार परिषद घेऊन दाखवावी, असे आव्हानही त्यांनी शिवेंद्रराजेंना दिले आहे.

“त्यांची लायकी काय?” नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केल्यानंतर शिवसेना नेत्याचा संताप, म्हणाले “नादाला लागलात तर…”

राजकीय कारकीर्द नगरसेवकपदापासून सुरू केल्याचे सांगताना उदयनराजे यांनी शिवेंद्रराजेंच्या जनसंपर्कावरुन टीका केली आहे. सातारा विकास आघाडी ५० जागा जिंकणारच, असा विश्वास उदयनराजेंनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. शिवेंद्रराजे यांच्या आघाडीचा एकही उमेदवार निवडून येणार नाही. या निवडणुकीचा निकाल आत्ताच लागला आहे, असा दावादेखील उदयनराजे यांनी केला आहे.

हिंदू मुलीचा पाठलाग, फुलं उधळली, मध्य प्रदेशातील धक्कादायक घटना, म्हणाला “इस्लाम स्वीकार, लग्न कर, अन्यथा…”

उदयनराजे आणि शिवेंद्रराजे भोसले या बंधूंमध्ये सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीवरुन आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. शिवेंद्रराजे भोसलेंनी उदयनराजेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. हे आरोप सिद्ध झाले, तर अजिंक्यतारा किल्ल्यावरून उडी मारेन, असे उदयनराजे म्हणाले आहेत. या आरोपांबाबत पुरावे देऊ न शकल्यास शिवेंद्रराजेंनी या किल्ल्यावरुन उडी मारावी, असे आव्हान उदयनराजे यांनी दिले आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *