Headlines

‘होय मी, स्टेरॉयड्स घेतले अन्…’, अभिनेता इमरान खानने उघड केलं बॉलिवूडचं काळं सत्य; म्हणाला ‘ड्रग्जचा अतीवापर…’

[ad_1]

बॉलिवूड अभिनेता इमरान खानने ‘जाने तू या जाने ना’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. पण हा एकमेव चित्रपट वगळता त्याला करिअरमध्ये फारसं यश मिळालं नाही. अखेर यानंतर इमरान खानने बॉलिवूडमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. पण आता तो पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत असल्याने त्याच्या नावाची चर्चा सुरु आहे. यादरम्यान त्याने इंस्टाग्रामला शेअर केलेली एक पोस्ट सध्या चर्चेत आहे. यामध्ये त्याने बॉलिवूडचं काळं सत्य उघड केलं आहे. 

आमीर खानचा भाचा असणाऱअया इमरान खानने ‘कयामत से कयामत तक’ चित्रपटात बालकलाकाराची भूमिका निभावत आपल्या करिअरची सुरुवात केली होती. दरम्यान सध्या बॉलिवूडपासून दूर असणाऱ्या इमरान खानने इंस्टाग्रामला एक पोस्ट शेअर केली आहे. माझी शरीरयष्टी काटक असल्याने मी इतका कंटाळलो होतो की, स्टेरॉयड्स घेण्यास सुरुवात केली होती असा खुलासा इमरान खानने केला आहे. 
.
इमरान खानने इंस्टाग्रामला आपले काही जुने फोटोही शेअर केले आहेत. यामध्ये त्याने आपण काटक असल्याने तरुणपणातही छोट्या साईजचे टी-शर्ट घालत होतो असं त्याने सांगितलं आहे. इमरानने सांगितलं आहे की, “माझा पहिला चित्रपट ‘जाने तू या जाने ना’ मध्ये मी मस्कुलर दिसण्याची गरज नव्हती. पण तरीही मी जास्त काटक दिसू नये यासाठी डबल लेयरचे कपडे घालण्यात आले होते”.

“माझा दुसरा चित्रपट किडनॅप दरम्यान मी शरिरयष्टी कमावण्यासाठी जीमला जाण्यास सुरुवात केली. पण त्यानंरही हा लहान मुलगा वाटतो अशा कमेंट माझ्यावर करण्यात आल्या. मला इतकं असुरक्षित वाटू लागलं होतं की, मी व्यायामासह स्टेरॉयड घेण्यासही सुरुवात केली. गेल्या काही वर्षांपासून मी डिप्रेशनचा सामना करत होतो. ज्यामुळे मी वर्कआऊट करणं बंद केलं होतं. यानंतर मी पुन्हा काटक दिसू लागलो होतो,” असं इमरानने सांगितलं आहे.

आपल्या डाएटबद्दल बोलताना त्याने सांगितलं की, “मी आता जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा मी योग्य व्यायाम करत होतो असं दिसतं. पण त्यावेळी असुरक्षेच्या भावनेपोटी हे सर्व केलं. मला शक्तिशाली व्हायचं असल्याने मी हे प्रयत्न केले. न्यूट्रिशन्सशिवाय व्यायामाला महत्त्व नाही. एका दिवसात 6 मिल्स, 4000 कॅलरी, चिकन ब्रेस्ट, अंडी अशा सर्व योग्य गोष्टी करुनही माझा बायसेप्स पडद्यावरील हिरोप्रमाणे दिसत नव्हते. त्यासाठी मला प्रोटीन, क्रिएटीन, ल्यूसीन, ग्लूटामाइन, एल-कार्निटाइन, एनाबॉलिक स्टेरॉयड यांची गरज होती” 

खरं तर हा भाग आम्ही इतक्या जाहीरपणे स्विकारणं अपेक्षित नसतं. यामुळे दृष्टीकोन बिघडू शकतो असंही त्याने लिहिलं आहे. पुढे त्याने म्हटलं आहे की, “गेल्या काही वर्षात मानसिक तणावात मी वर्कआऊट करणं बंद केलं होतं. मी आधीपेक्षा फार काटक झालो. जेव्हा माझे फोटो काढण्यात आले तेव्हा तब्येत आणि ड्रग्जची चर्चा झाली. मला फार लाजिरवाण वाटत होतं. पण आता मी चांगल्या स्थितीत आहे. आता मी आरोग्याला प्राधान्य देतो. मला आता माझ्याबद्दल वाईट वाटत नाही”.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *