Headlines

Adipurush Trailer Launch ला इतकी गर्दी झाली, की शेवटी नटूनथटून आलेल्या Kriti Sanon ला जमिनीवरच बसावं लागलं

[ad_1]

Adipurush Trailer Launch Video: ‘आदिपुरूष’ या चित्रपटाचा ट्रेलर हा काल नुकताच (Tralier Launch Kiti Sanon) प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरची सगळ्यांना उत्सुकता लागून राहिली होती. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून हा ट्रेलर सध्या सगळीकडेच व्हायरल होताना दिसतो आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चला अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. परंतु यावेळी या ट्रेलर लॉन्चला अनेक दिग्गज मंडळींनीसह माध्यमं आणि चाहत्यांनीही हजेरी लावली होती.

त्यामुळे चित्रपटगृहात इतकी गर्दी जमली होती की, खुद्द या चित्रपटातील नायिका सीता म्हणजेच क्रिती सनन (Kiti Sanon Funny Video at Adirpurush Trailer Launch) हिला बसायलाही जागा मिळाली नाही आणि त्यामुळे तिला अक्षरक्ष: जमिनीवरच बसून अदिपुरूषचा ट्रेलर एन्जॉय करावा लागला आहे. सध्या याचा व्हिडीओ हा सगळीकडे व्हायरल झाला आहे. (Adipurush Trailer Launch  actress kriti sanon sit down on the ground as the theatre packs full with the audience video viral)

गेल्या वर्षी ‘आदिपुरूष’ या चित्रपटाचे पोस्टर्स प्रदर्शित झाले होते. त्यावरून बराच वादंग माजला होता. प्रभु राम, सीता आणि रावण, हनुमान यांच्या लुकविषयी अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये परत लुक्स हे बदलले गेल्याचे समजते आहे तर काहींची छाटणीही करण्यात आली आहे. सध्या हा ट्रेलर सगळ्यांच्या (Adipurush Trailer Reactions) चर्चेचा विषय ठरला आहे. यावेळी ट्रेलर लॉन्चला चक्क क्रिती सनन थिएटरच्या खुर्च्यांच्या जवळ बसल्याची दिसते आहे. सध्या तिचे हे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. त्यामुळे सगळीकडेच एकच चर्चा रंगली आहे आणि नेटकरी या व्हिडीओखाली कमेंट्स करताना दिसत आहेत.

हेही वाचा – Jawan च्या दिग्दर्शकानं चाहत्यांना दाखवली बाळाची पहिली झलक; पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचं दर्शन

ट्रेलर लॉन्चला दिग्गजांची उपस्थिती 

काल प्रदर्शित झालेल्या ट्रेलर लॉन्चला क्रिती सनन, प्रभास आणि दिग्दर्शक ओम राऊतसह चित्रपटाच्या संपुर्ण टीमनं हजेरी लावली होती. या चित्रपटातून (Adipurush Cast) सीताची भुमिका क्रिती सनन आणि प्रभु रामाची भुमिका ही सुपरस्टार अभिनेता प्रभास यांनी साकारलेली आहे. यावेळी हनुमानाची भुमिका साकारणारे अभिनेते देवदत्त नागे, सनी सिंग, भुषण कुमार देखील उपस्थित होते. 

 ट्रोलरच्या निशाण्यावर क्रिती सनन 

सध्या क्रितीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे. यावर नेटकऱ्यांनी तूफान कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. यावेळी क्रितीला ट्रोलर्सनी ट्रोलही केलं आहे. त्यातून काहींनी तिचे कौतुकही केले आहे. त्यामुळे तिच्या या व्हिडीओखाली अनेकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. परंतु कॅमेऱ्यामध्ये क्रिती सननचे हावभाव चांगलेच टिपले गेले आहेत. त्यामुळे हा व्हिडीओ सगळ्यांच्याच चर्चाचा विषय ठरला आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *