Headlines

Adipurush नं केलं हताश; सोशल मीडियावर मीम्सचा धुमाकूळ

[ad_1]

Adipurush Review by Critics: ‘आदिपुरूष’ या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली होती. आज हा चित्रपट अखेर प्रदर्शित झाला आहे. ‘तान्हाजी’ या चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शक ओम राऊत कोणतातरी हटके सिनेमा आणत आहे याची सर्वत्र चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर रामायणावर आधारित हा चित्रपट असेल यावर निर्माते आणि दिग्दर्शकांकडून शिक्कामोर्तब झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये त्यांच्या चित्रपटाची चांगलीच उत्सुकता होती. दोन वर्षे या चित्रपटाची चर्चा रंगल्या नसल्यानंतर अखेर या चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. परंतु पहिली झलक आल्यानंतर मात्र या चित्रपटाच्या टीझरवर कडाडून टीका झाली होती. त्यामुळे इंटरनेटवर या चित्रपटाच्या मेकर्सना ट्रोल करण्यात आले होते.

रावण, हनुमान, प्रभु श्री राम आणि सीता यांचे चुकीच्या पद्धतीनं प्रदर्शन केल्यामुळे निर्मात्यांवर सपाटून केली होती. मागील महिन्यात या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यानंतरही या चित्रपटावरील टीका ही कायमच होती. हा ट्रेलर मात्र सर्वत्र व्हायरल झाला होता आणि हा व्हिडीओ सर्वत्र ट्रेडिंग होता. त्यानंतर या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर आला आणि मग या चित्रपटातील गाणीही प्रदर्शित झाली. या चित्रपटाच्या ट्रेलरला चांगला आणि वाईट दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या परंतु आता हा चित्रपट अखेर प्रदर्शित झाला असून इंटरनेटवर मात्र या चित्रपटावरून तूफान मीमगिरी सुरू झाली आहे. जनमानसात आणि समीक्षकांनी या चित्रपटाला नेगेटिव्ह रिव्हूज दिले आहेत. 

हेही वाचा – खर्च भागत नाहीये; विनोदाचा किंग कपिल शर्माला एकदम काय झालं?

सुप्रसिद्ध चित्रपट समीक्षक आणि ट्रेड विश्लेषक तरन आदर्श यांनी एक आणि अर्धा स्टार देत निराशाजनक असं म्हटलं आहे. त्यातून अनेक मोठ्या विश्लेषकांनी आणि समीक्षकांनाही या चित्रपटाला नकारात्मक रिव्हूज दिले आहेत. जनमानसातही हा चित्रपट प्रेक्षकांची मनं जिंकून घेऊ शकला नाही. त्यामुळे या चित्रपटाची सर्वत्र नेगेटिव्ह पब्लिसिटीच होताना दिसते आहे. नेटकऱ्यांनी या चित्रपटाला ट्रोल केलं आहे. त्यातून या चित्रपटात प्रचंड प्रमाणात व्हिएफएक्स वापरण्यात आले असून सेनेमॅटिक लिब्रटी वापरण्यात आली आहे, अशी मतं सोशल मीडियावर फिरू लागली आहे.

रामायण या इतक्या चांगल्या कथेची मोडतोड केल्याचेही अनेकांचे म्हणणे आहे तर चित्रपट जाणकारांनी आधुनिकीकरण करण्याच्या नादात या विषयाचा आत्मा गमावला आहे असं म्हटलं आहे.

Adipurush faces negetive criticism by critics memes goes viral

Adipurush faces negetive criticism by critics memes goes viral

तर बॉलिवूडच्या काही जाणकारांनी व सेलिब्रेटींनी चित्रपटाला शुभेच्छा आणि कौतुक केले आहे. अभिनेता सुबोध भावेनंही पोस्ट शेअर करत ओम राऊत यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 2015 साली आलेल्या ‘लोकमान्य’ या चित्रपटातून एकत्र कामं केले होते. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *