Headlines

12th Fail फेम मेधा शंकरला मिळाला IMDb स्टारमीटर पुरस्कार!

[ad_1]

Medha Shankr : जगातील मूव्हीज, टीव्ही शोज आणि सेलिब्रिटीजवरील माहितीचा सर्वांत विश्वसनीय स्रोत असलेल्या IMDb नं ‘ब्रेकआउट स्टार’ स्टारमीटर पुरस्कार जाहिर केला. ’12th फेल’ अभिनेत्री मेधा शंकरला हा पुरस्कार मिळाल्याची घोषणा केली आहे. या पुरस्कारामध्ये IMDb app वर सर्वाधिक परफॉर्म करणाऱ्या प्रसिद्ध भारतीय सेलिब्रिटीजमधील कलाकारांना नावाजले जाते. त्यामध्ये जगभरातून दर महिन्याला IMDb वर येणाऱ्या 20 कोटींपेक्षा जास्त व्हिजिटर्सचं वास्तविक पेज व्ह्यूज लक्षात घेतले जातात आणि मग त्यातून ठरवलं जातं की कोणता कलाकार ब्रेकथ्रू मूमेंटच्या जवळ आहे. 

मेधा शंकरला सध्या विधू विनोद चोप्रा यांच्या ’12th फेल’ मध्ये बघता येईल. हा चित्रपट आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मांच्या आणि आयआरएस अधिकारी श्रद्धा जोशी यांच्या आयुष्यावर आधारीत आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मेधा शंकरला जानेवारीमध्ये प्रसिद्ध भारतीय सेलिब्रिटीजच्या टॉप 10 यादीत तीन वेळेस स्थान मिळाले. तर दोन आठवडे ती पहिल्या स्थानावर होती. 12th फेल सध्या सर्वोत्तम 250 भारतीय चित्रपटांच्या यादीमध्ये पहिल्या स्थानी आहे व त्याचे IMDb रेटींग हे 9.1 आहेत. मेधा शंकरनं आधी काम केलेल्या चित्रपटांविषयी बोलायचे झाले तर तिनं ‘दिल बेकरार’, ‘मॅक्स’, ‘मिन मॅक्स अॅन्ड मेओवझाकी’ आहेत.

मेधा शंकरनं म्हटलं की, “IMDb ब्रेकआउट स्टार’ स्टारमीटर पुरस्कार मिळाल्याचा मला अतिशय आनंद आहे, ही अतिशय विशेष बाब आहे आणि IMDb या मूव्हीजवरील सर्वांत विश्वसनीय स्रोताकडून हे मिळाल्याचा वेगळा आनंद आहे. श्रोत्यांचं प्रेम माझ्यासाठी सर्वांत मोठं आहे आणि मला या भुमिकेसाठी इतकं प्रेम दिल्याबद्दल मला माझ्या चाहत्यांना धन्यवाद द्यायचे आहेत.”

हेही वाचा : भारती सिंगला हवा घालणारा ‘तो’ माधुरी दीक्षितचा मुलगा आहे हे कळताच तिला बसला धक्का; करण जोहरनं काय केलं माहितीये?

जगभरातील प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या व त्यांना आनंद देणाऱ्या ’12th फेल’ मधील तिच्या सशक्त भुमिकेसाठी IMDb नं मेधाचे अभिनंदन केले. आधीच्या IMDb ‘ब्रेकआउट’ स्टारमीटर पुरस्काराच्या विजेत्यांमध्ये भुवन अरोरा, अंगिरा धर, आदर्श गौरव, एश्ले पार्क, नताशा भारद्वाज, अयो एडिबिरी आणि रेगे- जीआँ पेज.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *