Headlines

‘सातवा ऋतू’ रोहिणी निनावे यांचा पहिला काव्यसंग्रह

[ad_1]

मुंबई : आडनाव निनावे असूनही प्रचंड नाव मिळविणारी कवयित्री म्हणजे रोहिणी निनावे. बा.भ. भोरकर,  कुसुमाग्रज या मराठीतील सुप्रसिद्ध  कवींसारख्याच वाचनीय आणि स्मरणात राहण्याजोग्या रोहिणी यांच्या कविता आहे.  बा.भ. भोरकरांच्या काव्यात आढळणारी सहजता, चित्रमयता रोहिणीजींच्या  काव्यातून अनुभवायला मिळते.  तर कुसुमाग्रजांच्या काव्यातून मिळणारा मुहावरे वजा संदेशही ह्या कविता देतात. भाषेची प्रासादिकता, कृतज्ञतेची तृप्तता आणि हिंदोळ्यावर झुलणाऱ्या या कविता वास्तवाची जाण करून देणाऱ्या इतक्या सहज सुंदर अशाच आहेत,” असे कौतुकोद्गार  सुप्रसिद्ध लेखक आणि भारतीय प्रशासकीय सेवेत निवृत्त अधिकारी विश्वास पाटील यांनी काढले. गेली २७ वर्ष हिंदी मराठी टेलिव्हिजन क्षेत्रात लेखनाची मुशाफिरी करणाऱ्या आणि  १२ हजारांपेक्षा जास्त एपिसोड्स लिहिणाऱ्या रोहिणी निनावे यांच्या “सातवा ऋतू” या काव्य संग्रहाचे प्रकाशन झाले. त्यावेळी विश्वास पाटील बोलत होते.  या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून  सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे, सुप्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता जोशी-सराफ आणि  सुप्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे  यांची देखील उपस्थिती लाभली.  “सातवा ऋतू” हा रोहिणी निनावे यांचा पहिला काव्यसंग्रह आहे. 

“सातवा ऋतू” च्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ‘पानिपत’, ‘झाडाझडती’, ‘महानायक’कार  विश्वास पाटील यांनी  रोहिणीजींमधल्या लेखिकेचेही कौतुक केले. “मालिका लिहिणे हे सोप्पे काम नाही;  पण ते रोहिणीजी व्रतस्थपणे करीत आहे. मंत्रालयातील निरस, साचेबद्ध नोकरीत असतानाही  रोहिणीजींनी  ते केले आहे.  रोहिणीजींच्या मालिकेतील स्त्री व्यक्तीरेखा ह्या जेवढ्या निराळ्या आहेत; तेवढ्याच त्या कणखरही आहेत. मला वाटते  या नायिकांच्या जन्माच्या प्रवासावरही रोहिणीजींचे स्वतंत्र पुस्तकही होईल, “असा विश्वास पाटील यांनी जाहीरपणे प्रस्ताव रोहिणीजींच्या समोर ठेवला. या प्रस्तावाला   प्रेक्षकांकडून दादही मिळाली. 

“स्त्रीच्या अंतरमनातील भावना रोहिणी खूप चांगल्या प्रकारे  मांडते,” अशी भावना ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता जोशी-सराफ यांनी  कार्यक्रमात व्यक्त केली. ” वसंत निनावे यांची कन्या म्हणून रोहिणी मला परिचित होती. पण प्रत्यक्षात आम्ही भेटलो ते ‘अगं बाई सासूबाई’ या मालिकेमुळे.रोहिणी स्त्रीच्या अंतरमनातील भावना खूप चांगल्या प्रकारे मांडते. याचा प्रत्यय मला  ‘अगं बाई सासूबाई’च्या निमित्ताने आला आहे.  एखादा विषय मांडण्याची तिची  लेखनशैली ही जी हळुवार आहे ,तितकीच ती सहज सुंदर आहे. तिची भाषा  प्रासादिक असली  तरी बोजड वाटत नाही.  त्यामुळे तिने  लिहिलेल्या मालिका, त्यातील व्यक्तिरेखा ह्या आपल्याला आपल्यातील वाटतात.  लॉकडाऊनच्या काळात तिने तिच्या  फेसबुकच्या वाॅलवर टाकलेल्या कविता वाचताना निःशब्द व्हायचे. अशा प्रतिभावान कवयित्री, लेखिकेच्या पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थीत राहण्याची संधी मिळणे हा मी माझा सन्मान समजते, ” अशा शब्दांत निवेदिता सराफ व्यक्त झाल्या. 

 ‘मेनका प्रकाशन’तर्फे प्रकाशित झालेल्या  “सातवा ऋतू” या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनावेळी रोहिणी निनावे यांच्या निवडक कवितांचे वाचन अभिनेत्री आसावरी जोशी, जुई गडकरी, शमा निनावे, अभिनेते आस्ताद काळे, मिलिंद फाटक आणि प्रसाद आठल्ये यांनी केले.  ‘सुंदर’, ‘दंश’, ‘आई’, ‘माझं बरं चाललंय’, ‘लेबल्स’ या  “सातवा ऋतू” तील निवडक कवितांचे वाचन करण्यात आले.  ‘आई’ कविता वाचताना उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. तर ‘लेबल्स’ या कवितेला दाद मिळाली.  या कार्यक्रमास कुमार सोहोनी, शिल्पा नवलकर, अमृता राव, अभिजीत गुरु , पल्लवी करकेरा यांच्यासारख्या  मराठी नाटक, चित्रपट, मालिका आणि संगीत क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती उपस्थिती लाभली.[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *