Headlines

भारताचा प्राण संविधान – प्रा.सुनिल स्वामी

सोलापूर – देशात राजेशाही होती जात पंथ रूढी परंपरा मनस्मृती ,भेदभाव, सामाजिक विषमता असताना सुखाच राज्य आणण्यासाठी सविधानाची निर्मिती करण्यात आली. या देशातील लोकांना मतदानाचा अधिकार दिला. संविधानाने देशातील लोकांना समान दर्जा दिला.त्यामुळे संविधान हे भारताचा  प्राण आहे ,  असे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य पदाधिकारी प्रा.सुनील स्वामी यांनी केली. ते स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित ऑनलाईन व्याख्यान मालिकेत बोलत होते.
     
 
भारत अनेक धर्माचा देश आहे.प्रत्येकाला प्रत्येकाच्या धर्मानुसार वागण्याचा , आचरण  करण्याचा , श्रद्धा ,उपासना करण्याचा अधिकार सविधानांने  दिला आहे.भारताची एकात्मता ही संपूर्ण जगाला परिचित आहे .त्यामुळे आपला देश धर्मनिरपेक्ष देश म्हणून ओळखला जातो.

संविधानाने शिक्षणाचा हक्क , मूलभूतहक्क व कर्तव्य  दिले आहे.ते हक्क व  कर्तव्य आपण आचरणात आणले पाहिजे.त्याचबरोबर सविधानाचे रक्षण करणे हे ही आपले कर्तव्य आहे.सविधानाचे रक्षण करणे ,  हे देशातील प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. देशातील लोकशाही बळकट होण्यासाठी लोकशाही मध्ये प्रत्येक व्यक्तीला मताचा अधिकार दिला आहे.

या देशाच भविष्य हे युवकांवर अवलंबून आहे.यासाठी तत्परतेने सजग राहून या संविधानाचे रक्षण केले पाहिजे. एक माणूस म्हणून जगण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे.आपले संविधान हा आपल्या देशाचा आरसा आहे.ज्यामध्ये आपण स्वतःला पाहून आपण आपल्या देशाचा कारभार चालवतो.समाजातील प्रत्येक व्यक्तीला भेदभाव विरहित आणि स्वातंत्र्य-समता-बंधुता या नितीमूल्यांवर आधारित जगण्यासाठी प्रेरीत करतोय. असे सुनील स्वामी यांनी सांगितले.
         
या व्याख्यानास एसएफआय चे जिल्हा अध्यक्ष राहुल जाधव, जिल्हा सचिव मल्लेशम कारमपुरी, एसएफआय चे मार्गदर्शक किशोर झेंडेकर, पूजा कांबळे, पल्लवी मासन, गणेश भोईटे, राजेश्वरी पडाल, दुर्गादास कनकुंटला, पूनम गायकवाड, प्रशांत आडम, राहुल भैसे, लक्ष्मी रच्चा, मुस्तफा बागवान, जयकुमार सोनकांबळे, स्नेहलता दाभाडे, विजय एडके, शकील बिराजदार इ.सह विद्यार्थी व कार्यकर्ते सहभाग घेतला.अशी माहिती जिल्हा सचिव मल्लेशम कारमपुरी यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *