Headlines

केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणाविरुद्ध ऑल इंडिया युथ फेडरेशन आक्रमक

कोल्हापूर – देशात कोरोंनामुळे विदारक परिस्थिती निर्माण झाली असून केंद्र सरकार याकडे गांभीर्याने पाहत नाही.प्रत्यक्ष आर्थिक मदतीची गरज असताना , कर्ज पॅकेज जाहीर केल.लोकांच्या अडचणीकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.कोरोनाग्रस्त रुग्णाचा आकडा रोजच्या रोज वाढत आहे.बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. ठोस शैक्षणिक धोरण नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे.शासनाच्या उदासीनतेमुळे लोकांमध्ये नैराश्याची भावना आहे. शेतकरी , विद्यार्थी ,  बेरोजगार तरुण  आत्महत्या करत आहेत.या मागण्या कडे लक्ष वेधण्यसाठी ऑल इंडिया युथ फेडरेशन कोल्हापूर शाखेच्या वतीने  दसरा चौकात आंदोलन करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्याचे शैक्षणिक कर्ज माफ करावे.प्रत्येक कुटुंबाला कोरोंना रिलीफ फंड म्हणून 10 हजार रुपये मदत द्यावी. वैद्यकीय शिक्षणामध्ये देशभरात ओबीसींना २७ टक्के आरक्षण लागू करावे.सर्व खाजगी हॉस्पिटलचे राष्ट्रीयकरण करावे.सार्वजनिक क्षेत्राचे खाजगीकरण थांबवा.भगतसिंग रोजगार हमी योजना कायदा लागू करा.विज बिल फोन बिल व कर्जांचे हप्ते तीन महिन्यासाठी रद्द करा. कर्ज हप्त्यांचे व्याजा आकारू नये.दलित, मुस्लिम व मानव अधिकार कार्यकर्त्यांचे अटकसत्र थांबवा.पेट्रोल डिझेल भावावाढ मागे घ्या.अशा मागण्या करण्यात आल्या.

यावेळी कॉ.गिरीश फोंडे,जावेद तांबोळी,आरती रेडेकर अमोल देवड़कर, राम करे, लखन करे, मंगेश कांबळे, आनंद सातपुते,भारत गणेशाचार्य, अविनाश पाटील , रवींद्र जाधव संतोष पोवार ,सचिन कांबळे, पूनम कांबळे ,कार्तिक पाटील,  विशाल भोसले ,योगेश जाधव  उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *