Headlines

जातीय अत्याचारग्रस्त भागात विशेष न्यायालय स्थापन करण्यात यावे – वंचित बहुजन आघाडी

अक्कलकोट – आज वंचित बहुजन आघाडी शाखा अक्कलकोटच्या वतीने श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्यात घडलेल्या जातीय अत्याचाराच्या घटनांची चौकशी करावी. घटनेतील आरोपी वर कडक कारवाई करण्यात यावी.अशा आशयाचे निवेदन माननीय नायब तहसीलदार गायकवाड साहेब यांना देण्यात आले.

निवेदनात पुणे ,अहमदनगर , बीड , नागपूर व महाराष्ट्रातील इतर अत्याचारग्रस्त भागात विशेष न्यायालय अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायद्याच्या कलम 15 नुसार स्थापन करावी. अरविंद बनसोडे आणि विराज जगताप व इतर सर्व तक्रार दारांच्या मागणीनुसार विशेष सरकारी वकिलांची नियुक्त करावी.प्रत्येक जिल्ह्यात सामाजिक दृष्ट्या जागरूक असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांमार्फत जातीय अत्याचारांची चौकशी करण्यात यावी.या मागण्या करण्यात आल्या आहेत.

माननीय मुख्यमंत्री अध्यक्षतेखाली अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याच्या पी सी आर चा आढावा घेण्यासाठी राज्यस्तरीय दक्षता आणि देखरेख समितीची तातडीची बैठक घ्यावी.गृह मंत्रालयामार्फत 2 फेब्रुवारी 2019 च्या अधिसूचनेनुसार अहवाल प्रकाशित करावी.
अनुसूचित जाती जमाती पी.ओ.ए अधिनियम आणि नियमांचा नियम एक अंतर्गत तातडीने मॉडल अस्मिता योजना अंमलात आणावी.

या मागण्याचे निवेदन आज अक्कलकोट तहसील कार्यालय येथे देण्यात आले. याप्रसंगी भारिप बहुजन महासंघाचे जिल्हा युवक आघाडीचे जिल्हा अध्यक्ष संदेश इंगळे तालुका महासचिव नितीन शिवशरण भारिप बहुजन महासंघाचे माजी तालुकाध्यक्ष शिलामणी दादा बनसोडे भारिप बहुजन महासंघाचे माजी तालुका अध्यक्ष गौतम मडिखांबे भारिप बहुजन महासंघाचे माजी तालुकाध्यक्ष संदीप मडी खांबे सिद्धार्थ साळे शहर महासचिव राहुल मोरे तालुका संघटक बबन गायकवाड तालुका उपाध्यक्ष नरसिंह गायकवाड शहर उपाध्यक्ष शरणू शिंगे शहर उपाध्यक्ष नागेश हरवाळकर राहुल हरवाळकर मल्लिनाथ पाटील जिल्हा उपाध्यक्ष देवानंद अस्वले . सम्यक विद्यार्थी आंदोलन अक्कलकोट तालुकाध्यक्ष रवी पोटे गंगाराम वाघमारे गौतम बाळ शंकर तालुका उपाध्यक्ष गणेश भालेराव प्रसिद्धीप्रमुख संदीप गाजधने रोहित उघडे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *