Headlines

रश्मिका मंधाना रोज आपल्या मोलकरणीच्या पाया पडते, कारण जाणून आश्चर्य वाटेल

[ad_1]

Rashmika Mandanna touches house help feet: रश्मिका मंधाना (Rashmika Mandanna) ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक मोठी अभिनेत्री आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार म्हणून तिला ओळखलं जातं. चित्रपटातील तिच्या अभिनयाचं नेहमी कौतुक केलं जातं. नॅशनल क्रश म्हणून ओळख मिळाल्यानंतर प्रसिद्धीस आलेल्या रश्मिकाला ‘पुष्पा’ (Pushpa) चित्रपटामुळे आणखीन प्रसिद्धी मिळाली. वेगवेगळ्या कारणांमुळे रश्मिका नेहमीच चर्चेत असते. दरम्यान, एका मुलाखतीत रश्मिकाने आपल्या खासगी आयुष्याशी संबंधित असा एक खुलासा केला आहे ज्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 

रश्मिकाने एका मुलाखतीत आपण रोज मोलकरणीच्या पाया पडत असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान हा आपली मूल्यं आणि तत्वांचा भाग असल्याचंही ती सांगते. पण रश्मिका रोज आपल्या मोलकरणीच्या पाया का पडते? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना. तर यामागे एक असं कारण आहे जे वाचल्यानंतर तुम्हाला तिच्याबद्दल अभिमान वाटेल. 

रश्मिका मोलकरणीच्या पाया का पडते?

पुष्पा चित्रपट फेम रश्मि मंधानाने एका मुलाखतीत आपण रोज मोलकरणीच्या पाया पडत असल्याचं सांगितलं आहे. आपण लोकांमध्ये भेदभाव करु इच्छित नसल्याने रोज न चुकता ही गोष्ट करत असल्याचं ती सांगते. 

“छोट्या छोट्या गोष्टीही माझ्यासाठी महत्त्वाच्या असतात. मी उठवल्यानंतर माझ्या प्राण्यांसह वेळ घालवते. माझ्या मित्रांना भेटते. या गोष्टींमुळे मला खूप आनंद मिळतो. शब्दांमध्ये फार ताकद असते आणि हे शब्द ज्याप्रमाणे गोष्टी व्यवस्थित करु शकतात, त्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीला दूर करु शकतात. त्यामुळेच कोण काय बोलतं ही गोष्टी माझ्यासाठी फार महत्त्वाची आहे,” असं रश्मिका सांगते. 

“मी माझ्या डायरीत प्रत्येक छोटी मोठी गोष्ट लिहून ठेवत असते. मी आदर म्हणून प्रत्येकाच्या पाया पडते. मी माझ्या घरातील मोलकरणीच्याही पाया पडते. कारण मी कोणताही भेदभाव करत नाही. मी सर्वांचा समान आदर करते. हीच माझी ओळख आहे,” असं रश्मिकाने बाझार इंडियाशी (Bazaar India) बोलताना सांगितलं आहे. 

रश्मिकाच्या चित्रपटाबद्दल बोलायचं गेल्यास ‘मिशन मजनू’ या चित्रपटात ती शेवटची दिसली होती. 20 जानेवारीला नेटफ्लिक्सवर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. रश्मिकासह सिद्धार्थ मल्होत्रा या चित्रपटात मुख्य भूमिकेत होता. रश्मिकाने या चित्रपटात अंधाची भूमिका साकारली. पण हा चित्रपट सपशेल अपयशी ठरला. 

दरम्यान रश्मिका सध्या रणबीर कपूरसह ‘अॅनिमल’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. याशिवाय अल्लू अर्जूनसह ‘पुष्पा 2’ मध्ये ती दिसणार आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *