Headlines

“तुझी 47 वर्षीय आई प्रेग्नंट आहे”, वडिलांच्या फोननंतर 23 वर्षीय अभिनेत्रीला बसला धक्का; शेअर केली पोस्ट

[ad_1]

Arya Parvathi Becomes Sister: बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुरानाचा ‘बधाई हो’ चित्रपट तुम्ही पाहिला आहे का? या चित्रपटात अभिनेत्याची आई गर्भवती दाखवण्यात आली आहे. आता आपली आई या वयात मूल जन्माला घालणार असल्याने कुटुंबाला समाजाकडून ऐकावे लागणारे टोमणे, परिस्थिती यात दाखवण्यात आली आहे. दरम्यान एका अभिनेत्रीच्या घरी मात्र खरोखर असं घडलं आहे. मल्याळम अभिनेत्री आर्या पार्वतीच्या (Arya Parvathi) 47 वर्षीय आईने मुलीला जन्म दिला आहे. तिने इन्स्टाग्रामला पोस्ट शेअर केली असून त्याची एकच चर्चा रंगली आहे.

23 वर्षीय अभिनेत्री आर्या पार्वतीने आपल्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. आपली 47 वर्षीय आई पुन्हा एकदा आई झाल्याचं तिने जाहीर केलं आहे. इन्स्टाग्रामला शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिने, आपण मोठ्या बहिणीची तसंच आईची भूमिका निभावण्यासाठी तयार असल्याचं सांगितलं आहे. 

“23 वर्षांनी आमच्या घऱात बाळ जन्माला आल्याने आम्हाला प्रचंड आनंद झाला आहे. मोठी बहिण आणि आईची भूमिका निभावण्यासाठी आता मी तयार आहे. लवकर ये,” असं आर्या पार्वतीने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

Humans of Bombay ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने आईच्या गरोदरपणाबद्दल कळल्यानंतर धक्का बसल्याचं सांगितलं होतं. आपल्या मुलीला लाज वाटेल या भीतीने आई-वडिलांनी आपल्यापासून ही गोष्ट लपवून ठेवल्याचं तिने सांगितलं होतं. आपल्यालाही अनेकांचे टोमणे ऐकावे लागले, पण आपण त्याकडे लक्ष दिलं नाही असं ती सांगते. 

“एका फोन कॉलने माझं आयुष्यच बदललं. गतवर्षी मी सुट्टीवरुन घरी परतणार असतानाच मला वडिलांचा फोन आला. ते थोडे अस्वस्थ वाटत होते. काही मिनिटांनी त्यांनी आई गर्भवती असल्याचं सांगितलं. मला काय प्रतिक्रिया द्यावी हेच कळत नव्हतं. वयाच्या 23 व्या वर्षी आपल्या आई-वडिलांकडून असं काही ऐकायला मिळेल असं अपेक्षित नसतं. मला त्यावेळी धक्का बसला होता असं म्हणणंही थोडं कमीच ठरेल. आईचं वय 47 होतं.  हे ऐकण्यास थोडं विचित्र वाटेल, पण जेव्हा वडिलांनी मला आईच्या गरोदरपणाबद्दल सांगितलं तेव्हा तिला आधीच 8 महिने पूर्ण झाले होते. तिला स्वत:ला सात महिने पूर्ण झाल्यानंतर कळालं,”  असं आर्या पार्वतीने सांगितलं. 

मी काय प्रतिक्रिया देईन याची कल्पना नसल्याने आई-वडिलांनी ही बातमी सांगितली नव्हती असं आर्या पार्वतीने सांगितलं आहे. पण मला लाज का वाटावी? अशी विचारणाही तिने केली आहे.[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *