Headlines

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेत्रीने संपवलं जीवन, ‘ते’ पत्र मिळाल्यानंतर…

[ad_1]

मुंबई : टीव्ही इंडस्ट्रीमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री वैशाली ठक्करने (Vaishali Takkar) आत्महत्या केली आहे. अभिनेत्रीने इंदूरमधील राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवलं आहे. अभिनेत्रीने सुसाईड नोटही (Suicide note) मागे ठेवली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. वैशालीने टोकाचा निर्णय घेतल्यानंतर कलाविश्वात आणि चाहत्यांच्या मनात मोठी पोकळी तयार झाली आहे. 

पोलिसांनी सापडली सुसाईड नोट (actress Vaishali Takkar)
टीव्ही अभिनेत्री वैशाली ठक्कर गेल्या 1 वर्षांपासून इंदूरमध्ये राहत होती. अभिनेत्रीच्या आत्महत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून अभिनेत्रीचा मृतदेह ताब्यात घेतला. वैशालीच्या मृतदेहाजवळ पोलिसांना सुसाईड नोटही सापडली आहे. (vaishali takkar serials)

मिळालेल्या माहितीनुसार, तेजाजी नगर पोलिस स्टेशन या प्रकरणाचा तपास करत आहेत. अभिनेत्रीच्या आत्महत्येमागचे कारण पोलीस शोधत आहेत. घटनास्थळावरून पोलिसांना सुसाईड नोटही जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. अभिनेत्रीच्या आत्महत्येबाबत सुसाईड नोटमधून काय माहिती मिळते, हे लवकरच कळेल. (vaishali takkar vlogs)

वैशाली टीव्ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री होती. वैशालीने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं, वैशालीने 2015 मध्ये टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय मलिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मधून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. 

या शोमध्ये तिने संजनाची भूमिका साकारली होती. यानंतर वैशाली ‘ये है आशिकी’ मालिकेमध्येही दिसली होती. ‘ससुराल सिमर का’ मालिकमध्ये वैशालीने अंजली भारद्वाज ही भूमिका बजावली. (vaishali takkar serials)

‘ससुराल सिमर का’ मालिकेमधून वैशालीला प्रचंड लोकप्रियता मिळाली. याशिवाय वैशालीने ‘सुपर सिस्टर’, ‘मनमोहिनी सीझन 2’ मध्येही उत्तम काम केलं आहे.

 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *