Headlines

वर्षानुवर्षे चालेल Inverter ची बॅटरी, मिळेल जबरदस्त बॅकअप, करावे लगेल हे काम, पाहा डिटेल्स

[ad_1]

नवी दिल्ली:Inverter Battery: विजेच्या मदतीने रोजची बरीच कामे करता येतात आणि चुकून वीज गेली तर अनेक महत्वाची कामं थांबतात. हे टाळण्यासाठी, लोक त्यांच्या घरात किंवा ऑफिसमध्ये इन्व्हर्टर वापरतात. इन्व्हर्टरमध्ये एक बॅटरी असते जी विजेने चार्ज होते आणि जेव्हा वीज जाते तेव्हा हा इन्व्हर्टर तुमच्या घराला आणि ऑफिसला कित्येक तास वीज पुरवतो. पण, असेही दिसून येते की इन्व्हर्टरची बॅटरी खूप लवकर संपते, ज्यामुळे लोकांना ती वारंवार बदलावी लागते. जर तुम्हालाही या समस्येचा सामना करावा लागत असेल तर आम्ही तुम्हाला अशा तीन सोप्या टिप्स सांगत आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या इन्व्हर्टरची बॅटरी दीर्घकाळ वाढवू शकता.

वाचा: 5G Phones In India: २० हजारांपेक्षा कमीमध्ये घरी न्या ‘हे’ 5G स्मार्टफोन्स, मिळणार शानदार प्रोसेसर-जबरदस्त कॅमेरा

बॅटरीचे पाणी तपासत राहा:

कोणत्याही इन्व्हर्टरची बॅटरी त्यात असलेल्या पाण्यावर अवलंबून असते. जर तुम्हाला तुमची इन्व्हर्टर आणि बॅटरी जास्त काळ टिकवायची असेल तर, तुम्ही बॅटरीचे पाणी तपासत राहा. कारण, कमी पाण्यामुळे तुमच्या इन्व्हर्टरची बॅटरी लवकर खराब होऊ शकते . आजकाल बाजारातील इन्व्हर्टर मॉडेल्समध्ये बॅटरीची पातळी तपासण्यासाठी इंडिकेटर देखील येतात, ज्यामुळे तुम्ही बॅटरीच्या पाण्यावर सहज नजर ठेवू शकता आणि आवश्यकतेनुसार ते पुन्हा भरू शकता. साधारणपणे, कोणत्याही इन्व्हर्टरच्या बॅटरीला २-३ महिन्यांत पाणी लागते. रिफिलची गरज तुमच्या वापरावर अवलंबून असते.

वाचा: Moto Tab: १०.६१ इंच स्क्रीनसह येणाऱ्या Moto Tab G62 चा पाहिला सेल आज, मिळणार ‘हे’ भन्नाट ऑफर्स

इन्व्हर्टर ओव्हरचार्जिंग:

कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणाला जास्त चार्ज करणे हे उपकरणासाठी धोकादायक आणि हानिकारक असू शकते आणि तेच तुमच्या इन्व्हर्टरच्या बाबतीत आहे . जर इन्व्हर्टर पूर्णपणे चार्ज झाला असेल, तर त्याचे चार्जिंग थांबवा. आजचे नवीन मॉडेल्स ऑटो कटच्या सुविधेसह आले आहेत, जे इन्व्हर्टर पूर्णपणे चार्ज झाल्यावर आपोआप बंद होते. परंतु जुन्या मॉडेल्समध्ये हे वैशिष्ट्य मिळत नाही.

इन्व्हर्टर क्लिनिंग:

इन्व्हर्टर आणि त्याच्या Battery life साठी, इन्व्हर्टर ज्या ठिकाणी ठेवायचे आहेत ती जागा स्वच्छ ठेवा. अनेकवेळा असे दिसून येते की, मेन स्विच आणि इन्व्हर्टरच्या तारांमध्ये धुळीमुळे विद्युत प्रवाह कमी होतो. ज्यामुळे बॅटरी खराब होण्याची शक्यता वाढते. यासाठी तुम्ही इन्व्हर्टर आणि मेन स्वीच जोडणे, क्षेत्र आणि वायर स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. हे सर्व करत असताना मेन स्वीच काळजीपूर्वक बंद करा.

वाचा: Google Chrome युजर्स व्हा अलर्ट ! सरकारने जारी केली चेतावणी, दुर्लक्ष करणे पडेल महागात

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *