Headlines

Ganesh Chaturthi 2022: लाडक्या बाप्पाला दहा दिवस दाखवा ‘या’ वस्तूंचा भोग, इच्छित फलप्राप्तीला मिळणार गती

[ad_1]

Ganesh Charurthi 2022: भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला वाजतगाजत मोठ्या उत्साहात लाडक्या बाप्पाचं घरी आगमन होतं. यंदा 31 ऑगस्टला गणेश चतुर्थी असून उत्सवाची लगबग सुरु झाली आहे. दीड दिवसांपासून अनंत चतुर्थीपर्यंत गणपती घरात विराजमान असतात. गणपतीला सर्व देवांमध्ये पूजनाचा सर्वप्रथम मान असून कोणत्याही पूजनाची सुरुवात गणेश पूजनाने होते. कारण गणपतीला विघ्नहर्ता म्हटलं जातं आणि कोणतंही कार्य निर्विघ्नपणे पूर्ण करण्यासाठी गणपतीचं पूजन केलं जातं. या काळात लाडक्या बाप्पाला आवडता नैवेद्य दाखवला जातो. उत्सव काळात गणपतीला प्रिय वस्तूंचं भोग दिल्यास इच्छित फलप्राप्तीला गती मिळते. त्याचबरोबर गणपती बाप्पा संकट दूर करतात, अशी धार्मिक मान्यता आहे. 

गणपता बाप्पांना या वस्तू अर्पण करा

-गणपती बाप्पाला त्यांच्या आवडत्या वस्तू अर्पण केल्यास लवकर प्रसन्न होतात. त्यामुळे पहिल्या दिवशी त्यांना मोदक अर्पण करावेत.

-गणपती बाप्पांना लाडूही खूप आवडतात. त्यामुळे दुसऱ्या दिवशी त्यांना मोतीचूर लाडू अर्पण करा आणि त्यांचा आशीर्वाद घ्या.

-तिसऱ्या दिवशी गणपती बाप्पांना बेसनाचे लाडू अर्पण करा.

-गणपती बाप्पांना चौथ्या दिवशी केळ्यांचा प्रसाद अर्पण करा. गणपती बाप्पांना केळ्यांचा नैवेद्य भरपूर आवडतो.

-पाचव्या दिवशी गणपती बाप्पांना मखानेची खीर अर्पण करा. यामुळे गणपती बाप्पांची कृपा होते आणि इच्छित फलप्राप्ती होण्यास मदत होते.

-सहाव्या दिवशी श्रीफळ अर्थात नारळ अर्पण करावे. तर सातव्या दिवशी मेव्याचे लाडू बाप्पाला अर्पण करावेत. 

-आठव्या दिवशी दूधापासून बनवलेला कलाकंद अर्पण करू शकता. गणपती बाप्पांना कलाकंद खूप प्रिय आहे.

-नवव्या दिवशी गणपती बाप्पांना श्रीखंड अर्पण करू शकता. गणपतीला श्रीखंडाचा प्रसाद आवडतो, अशी धार्मिक मान्यता आहे.

-दहाव्या दिवशी गणपती बाप्पाला आवडते मोदक अर्पण करा आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद मिळवा.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *