Headlines

याला म्हणतात आत्मविश्वास! भर पत्रकार परिषदेत Rohit Sharma ने दिलं खुल्लं आव्हान, म्हणाला…

[ad_1]

Suryakumar Yadav : रविवारापासून सुरू होणाऱ्या ICC Men’s T20 World Cup 2022 साठी सर्वच संघ सज्ज झाले आहेत. वर्ल्ड कपपूर्वी सर्व संघाच्या कर्णधारांची पत्रकार परिषद (Press conference) आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी कॅप्टन्सने आपापल्या संघाबद्दल माहिती देत पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. त्यावेळी सर्वांचं लक्ष फक्त रोहित शर्माकडे (Rohit Sharma) होतं. एका प्रश्नाला उत्तर देताना रोहित असं काही वक्तव्य केलं की, सर्वच खेळाडू आश्चर्यचकित राहिले.

रोहित शर्माने पत्रकार परिषदेत (Rohit Sharma Press conference) उर्वरित संघांच्या कर्णधारांना स्पष्ट संदेश दिलाय. तुम्हाला विराट किंवा पांड्याकडून नाही, तर सूर्यकुमार यादवकडून (Suryakumar Yadav) सर्वात मोठा धोका आहे, असे संकेत रोहित शर्माने इतर संघांच्या कर्णधारांना दिले आहेत. त्यावेळी रोहितने सर्वांसमोर सुर्यकुमारचं कौतूक देखील केलं.

Suryakumar बद्दल काय म्हणाला Rohit?

सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हा आमच्या संघाचा X-फॅक्टर आहे. मला आशा आहे की तो या टी-20 विश्वचषकातही आपला जबरदस्त फॉर्म कायम ठेवेल. विरोधी गोलंदाजांवर हल्ला चढवण्यातही तो आपल्या कौशल्याचा पुरेपूर वापर करेल, असं रोहित शर्मा (Rohit Sharma) यावेळी म्हणाला. त्यामुळे जणू काही, हिंमत असेल तर सुर्याला रोखून दाखवा, असं आव्हान रोहितने सर्वांना दिलंय.

Bumrah च्या दुखापतीवर म्हणाला…

दरम्यान, रोहित शर्माने यावेळी सुर्यकुमारची गोडवी गायली, त्याचबरोबर त्याने बुमराहच्या (Jasprit Bumrah) दुखापतीवर देखील मोठं वक्तव्य केलंय. वर्ल्डकप आमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. मात्र पण बुमराह आमच्यासाठी त्यापेक्षाही महत्त्वाचा आहे. त्याच्याबाबतीत कोणतीही रिक्स घेऊ शकत नाही, असं रोहित म्हणाला आहे.

आणखी वाचा – जेव्हा Babar Azam आणि Rohit Sharma समोरासमोर येतात, तेव्हा…; पाहा ‘तो’ व्हिडीओ

बुमराह एक चांगला गोलंदाज आहे. मात्र दुर्दैवाने दुखापती या होतच राहतात. दुखापतींना आपण काहीही करू शकत नाही. त्यांच्या दुखापतीबद्दल आम्ही तज्ज्ञांशी बोललो, पण चांगला प्रतिसाद मिळाला नाही, अशी माहिती देखील रोहितने यावेळी दिली.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *