Headlines

या साऊथ स्टारसोबत डेब्यू करणार रवीना टंडनची लेक, वयात तब्बल 20 वर्षांचं अंतर

[ad_1]

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशा थडानी देखील लवकरच चित्रपटामध्ये पदार्पण करणार आहे. ती सध्या 18 वर्षांची आहे मात्र सिनेमात पदार्पण करण्याआधीच ती खूप लोकप्रिय आहे. राशा थडानीच्या पदार्पणाबाबत रोज वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहेत. मात्र आता आलेल्या अपडेटने खळबळ उडवून दिली आहे. राशाबद्दल अशी चर्चा आहे की, ती बॉलिवूडमध्ये नव्हे तर साऊथच्या एका चित्रपटातून अभिनयात पदार्पण करणार आहे, तीही तिथल्या एका सुपरस्टारसोबत.  

‘ओटीटी प्ले’च्या रिपोर्टनुसार, राशा थडानी लवकरच तेलगू चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करू शकते. ती साऊथचा सुपरस्टार राम चरणसोबत सिने इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री घेवू शकते.  या चित्रपटात ती फिट बसत असल्याची चर्चा आहे. मेकर्स लवकरच या अभिनेत्रीला या सिनेमासाठी साइन देखील करू शकतात.

राशा तिचा पहिला चित्रपट साऊथ स्टार राम चरणसोबत करणार असल्याच्या बातम्या आहेत. हा एक तेलुगु चित्रपट असेल, ज्यामध्ये राशा तिच्यापेक्षा 20 वर्षांनी मोठा अभिनेता राम चरणसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. वृत्तानुसार, राशाने या चित्रपटासाठी ऑडिशन देखील दिलं आहे आणि तिला या चित्रपटाची मुख्य अभिनेत्री म्हणून फायनल देखील करण्यात आलं आहे.

राशा दिसणार का रामचरणसोबत?
मात्र, चित्रपट निर्मात्यांनी अद्याप अशी कोणतीही घोषणा केलेली नाही. तसंच राशा थडानी किंवा राम चरण यांच्याकडून असं कोणतंही विधान समोर आलेलं नाही. काही काळापूर्वी अशीही बातमी आली होती की, राशा थडानी अजय देवगणची बहीण नीलम हिचा मुलगा अमन देवगणसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करू शकते.

रवीना टंडनच्या मुलीच्या डेब्यूवर गॉसिप
‘पिंकविला’च्या रिपोर्टनुसार, अमन देवगण आणि राशा यांची जोडी दिग्दर्शक अभिषेक कपूरच्या अॅक्शन अॅडव्हेंचर फिल्ममध्ये बनू शकते. मात्र, राशा यांनीही याबाबत कोणताही दुजोरा दिलेला नाही.

काय म्हणाली रवीना टंडन आपल्या मुलीच्या पदार्पणावर?
रवीना टंडनने अलीकडेच एका मुलाखतीत राशा थडानीच्या पदार्पणावर प्रतिक्रिया दिली होती. तेव्हा अभिनेत्री म्हणाली होती की, सध्या तिच्या मुलीला तिचं शिक्षण पूर्ण करायचे आहे आणि त्यानंतरच ती तिच्या पदार्पणावर लक्ष केंद्रित करेल.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *