Headlines

WhatsA pp Tricks : मित्राचं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस आवडलं? सोप्या स्टेप्स फॉलो करुन लगेच करु शकता डाऊनलोड

[ad_1]

नवी दिल्ली : WhatsApp एक असं अ‍ॅप आहे ज्याद्वारे तुम्ही तुमच्या मित्र आणि कुटुंबाशी कुठुूनही कनेक्ट राहू शकता. सर्वाधिक वापरलं जाणारं हे इन्स्टन्ट मेसेजिंग अ‍ॅप आहे. दरम्यान आपल्या युजर्सचा अनुभव आणखी सुधारण्यासाठी, कंपनी दररोज नवनवीन फीचर्स आणत राहते. जेव्हापासून कंपनीने स्टेटस फीचर जारी केले आहे, आजपर्यंत युजर्स त्यांच्या रोजच्या घडामोडी WhatsApp स्टेटसवर शेअर करत आहे.

दरम्यान या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसबद्दल बोलायचे झाले तर, एकदा अपलोड केले की स्टेटस २४ तासांसाठी दिसते. यामध्ये यूजर्स त्यांचा फोटो किंवा व्हिडिओ काहीही टाकू शकतात. मजकूर स्थिती देखील सेट केली जाऊ शकते. स्टेटस फीचर केवळ व्हॉट्सअ‍ॅपवरच नाही तर फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरही शेअर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अनेक वेळा आपल्याला एखाद्याचे व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस इतके आवडते की ते डाउनलोड करावेसे वाटते. पण त्याची पद्धत माहीत नसते. तर आज आम्ही तुम्हाला WhatsApp स्टेटस कसे डाउनलोड करायचे ते सांगत आहोत.

व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस खालीलप्रमाणे डाउनलोड करता येईल

1. सर्व प्रथम, File Manageer us अ‍ॅप डाउनलोड करा. तुम्ही ते प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता.
2. मग हे अ‍ॅप उघडा आणि नंतर अ‍ॅपमधील वरच्या उजव्या बाजूच्या मेनू चिन्हावर क्लिक करा. यानंतर, डाव्या बाजूचा मेनू ड्रॉवर स्लाइड करून उघडा. त्यानंतर सेटिंगमध्ये जा.
3. त्यात लपवलेल्या फाइल्स दाखवा हे टॉगल (Show Hidden files) चालू करा.
4. नंतर मुख्य पृष्ठावर परत जा. तळाशी Internel Storage पर्यायावर टॅप करा.
5. थोडे खाली स्क्रोल करा आणि WhatsApp फोल्डर शोधा. ते उघडा आणि नंतर मीडिया फोल्डरवर टॅप करा.
6. यामध्ये तुम्हाला .Statuses फोल्डर दिसेल. ते उघडा.
7. आता तुम्ही गेल्या २४ तासात पाहिलेले सर्व स्टेटस या फोल्डरमध्ये असतील. तुम्ही ते तिथूनच सेव्ह देखील करू शकता.

वाचा : जर प्राणी माणसांसारखे दिसले असते तर? AI नं तयार केलेले हे ‘विचित्र’ फोटो पाहिले का?

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *