Headlines

महेश कोठारे यांना मातृशोक, आदिनाथनं पोस्ट शेअर करत दिली माहिती…

[ad_1]

Mahesh Kothare’s mother Death : लोकप्रिय मराठीमोळे अभिनेते महेश कोठारे यांच्या आईचं निदन झालं आहे. सरोज कोठारे यांचे काल 15 जुलै रोजी वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले. सरोज यांचे कांदिवली येथील त्यांच्या निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. जानेवारी महिन्यातच त्यांच्या वडिलांचंही निधन झालं होतं. आता त्यांच्या आईच्या निधनानं कोठारे कुटुंबात शोककळा पसरली आहे. त्यांच्या मागे मुलगा प्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक महेश कोठारे, नातू प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता आदिनाथ कोठारे, सून नातसून आणि पणती असं कुटुंब आहे. 

महेश कोठारे यांचा मुलगा आणि अभिनेता आदिनाथ कोठारे याने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर करून आजीच्या निधनाविषयी माहिती दिली आहे. अभिनेते महेश कोठारे यांनी देखील ट्विट करून सरोज कोठारे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. तर त्यांच्या निधनाची बातमी देत ‘स्व. सौ. सरोज अंबर कोठारे यांना संपूर्ण कोठारे कुटुंबाकडून भावपूर्ण श्रद्धांजली. तुमच्या आत्म्याला शांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना,’ असं कॅप्शन आदिनाथनं दिलं आहे. 

जानेवारी महिन्यात महेश कोठारे यांचे वडील अंबर कोठारे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले होते. आता सहा महिन्यांनंतर लगेच सरोज कोठारे यांच्या निधनाने महेश कोठारे यांच्यावरील आईची छत्र छाया गेली आहे. 

सरोज माहेरच्या त्या तळपदे. 19 जून 1930 साली त्यांचा जन्म झाला होता. सरोज यांचे वडील माधवराव तळपदे हे बहुश्रुत व्यक्तिमत्त्व. त्यामुळेच सरोज यांच्यावर लहानपणापासून चांगले संस्कार झाले. प्रायोगिक रंगभूमीच्या ओढीने सरोज आणि महेश कोठारे यांचे वडील अंबर कोठारे यांची पहिल्यांदा भेट झाली. 1952 मध्ये त्यांचा विवाह झाला.  सरोज यांना ‘जेनमा’ हे टोपण नाव त्यांना त्यांच्या मावस बहिणीने दिले होते. सरोज आणि अंबर कोठारे यांनी कालांतराने ‘आर्टिस्ट कंबाइन’ नावाची नाट्यनिर्मिती संस्था स्थापन केली. या संस्थेतर्फे त्यांनी ‘लग्नाची बेडी’, ‘झोपी गेलेला जागा झाला’ या नाटकात सरोज आणि अंबर कोठारे यांनी एकत्र काम केले होते. 

महेश कोठारे यांच्या चित्रपटसृष्टीतील पदार्पणासाठी तसेच चित्रपटसृष्टीतील त्यांच्या प्रगतीसाठी सरोज यांनी उत्तरोत्तर विशेष मेहनत घेतली होती. महेश कोठारे यांनी बालकलाकार म्हणून ज्या गाजलेल्या हिंदी-मराठी चित्रपटांमध्ये अभिनय केला, त्या चित्रपटांच्या चित्रीकरणादरम्यान सरोज या महेशसोबत सतत असायच्या. महेश कोठारे यांनी चित्रनिर्मितीला सुरुवात केली ती ‘धुमधडाका’ चित्रपटापासून. या चित्रपटाची निर्मिती महेश कोठारे यांनी ‘जेनमा फिल्म्स इंटरनॅशनल’ या बॅनरद्वारे केली होती. ‘दे दणादण’, ‘धडाकेबाज’, ‘झपाटलेला’, ‘माझा छकुला’ आदी यशस्वी चित्रपटांची निर्मिती या बॅनरतर्फे करण्यात आली.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *