Headlines

सनी देओल दारुच्या नशेत मुंबईच्या रस्त्यावर भरकटला? काय आहे व्हायरल VIDEO चं सत्य

[ad_1]

बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. कारण या व्हिडीओत सनी देओल रस्त्याच्या मधोमध उभा असून, आजुबाजूने वाहनं जाताना दिसत आहेत. तसंच सनी देओलला आपला तोल सांभाळता येत नसतानाच एक रिक्षावाला त्याच्या मदतीसाठी थांबताना दिसत आहे. यानंतर तो सनी देओलला आपल्या रिक्षात बसवतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यासंबधी वेगवेगळे दावे केले जात आहे. पण या व्हिडीओमागचं नेमकं सत्य काय आहे हे जाणून घेऊयात.

व्हायरल झालेल्या या व्हिडीओत सनी देओल मद्यधुंद अवस्थेत असल्याचा दावा केला जात आहे. नुकतंच ‘गदर 2’ला मिळालेल्या तुफान यशामुळे सनी देओल चर्चेत असून, त्याचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी हैराण आहेत. व्हिडीओत सनी देओल मद्यधुंद अवस्थेत रस्त्याच्या मधोमध चालत आपला जीव धोक्यात घालत असल्याचं दिसत आहे. केआरकेने हा व्हिडीओ शेअर केला असून, हे फार धोकादायक असल्याचं लिहिलं आहे. 

व्हिडीओत नेमकं काय? 

व्हिडीओच्या सुरुवातीलाच सनी देओल एका चौकात चालताना दिसत आहे. सनी देओल तोल सांभाळता येत नसल्याने अडखळत चालत असताना, आजुबाजूने चारचाकी जाताना दिसत आहेत. याचवेळी एक रिक्षाचालक सनी देओलला पाहून थांबतो. तो सनी देओलची विचारणा करतो. यावेळी सनी देओल हसतो आणि काही वेळाने त्याच्या रिक्षात बसतो. 

‘गदर 2’ चं यश डोक्यात गेलं, नेटकऱ्यांची टीका

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहते नाराजी व्यक्त करत आहेत. काहींनी गदर 2 चित्रपटाला मिळालेलं यश त्याच्या डोक्यात गेल्याची टीका केली आहे. तर काहींनी त्याला या अवस्थेत पाहून खंत व्यक्त केली. पण खरंच सनी देओल मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावर फिरत होता का? जाणून घ्या काय आहे या व्हिडीओमागील सत्य…

‘सफर’ चित्रपटाचं शुटिंग

व्हिडीओ पाहिल्यानंतर जे वाटत आहे ते अजिबात सत्य नाही. सनी देओल मद्यधुंद अवस्थेत नसून हा चित्रपटाच्या शुटिंगचा सीन आहे. सनी देओल सध्या ‘सफर’ चित्रपटासाठी शुटिंग करत असून ते मुंबईत सुरु आहे. याचवेळी कोणीतरी तो व्हिडीओ शूट करुन व्हायरल केला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन शशांक उदरापुरकर करत आहेत. सनी देओलने एका मुलाखतीत आपण मद्यपान करत नसल्याचं सांगितलं होतं. 

बॉक्स ऑफिसवर ‘गदर 2’चा धुमाकूळ

सनी देओलचा ‘गदर 2’ ऑगस्ट 2023 मध्ये रिलीज झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. 2000 मध्ये रिलीज झालेल्या ‘गदर’चा हा सिक्वेल सनी देओलसाठी जीवनदान ठरला आहे. चित्रपटाने 10 आठवड्यांत बॉक्स ऑफिसवर 525 कोटी आणि जगभरात 686 कोटी रुपयांचा व्यवसाय केला.

सनी देओलकडे सध्या आमीर खान प्रोडक्शनचा ‘लाहौर 1947’ चित्रपटही आहे. राजकुमार संतोषी या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. आमीर खान आणि सनी देओल एकत्र काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *