Headlines

Weekend Mood : घरबसल्या OTT वर घ्या ‘या’ चित्रपट आणि Web Series चा आनंद

[ad_1]

Weekend Mood Movie And Series To Watch At Home : आज प्रत्येक व्यक्ती सुट्टीचा आनंद घेण्यासाठी तयार (Weekend Mode) आहे. शनिवार आणि रविवार अशा दोन सुट्ट्या असताना कोणते चित्रपट किंवा सीरिज पाहायला हवी हा विचार करण्याच किंवा सर्च करण्यात आपला बराच वेळ जातो. यंदा विकेंडला आपल्या सगळ्यांच मनोरंजन करण्यासाठी समंथा रुथ प्रभूच्या ‘यशोदा’, आयुष्मान खुराना आणि रकुल प्रीत सिंगच्या ‘डॉक्टर जी’पासून ते ऋषभ शेट्टीच्या कांतारापर्यंत; बॉक्स ऑफिसवर छाप पाडणारे अनेक चित्रपट आता नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ, डिस्ने प्लस हॉटस्टार, सोनी LIV, Zee5, Voot Select आणि इतर विविध OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहेत. दुसरीकडे, तापसी पन्नूचा ‘ब्लर’ आणि रणदीप हुडाचा ‘कॅट’ सारखे नवीन चित्रपट आणि वेब शो देखील ऑनलाइन पाहायला मिणळार आहेत. 

पाहा कोणते चित्रपट आणि सीरिज तुम्ही घरी बसल्या पाहू शकता.

कांतारा (Kantara in Hindi)
दाक्षिणात्य अभिनेता ऋषभ शेट्टी (Rishabh Shetty) स्टारर कांतारा अखेरीस हिंदीमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला असला तरी हिंदीत हा चित्रपट अजून प्रदर्शित झालेला नाही. हा चित्रपट आज हा 9 डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर हिंदीमध्ये प्रदर्शित झाला आहे. 

यशोदा (Yashoda)
अभिनेत्री समंथा रुथ प्रभूचा (Samantha Ruth Prabhu) ‘यशोदा’ (Yashoda) देखील OTT वर प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट एका महिलेच्या आयुष्यावर आहे जी तिच्या हरवलेल्या बहिणीला शोधण्यासाठी हताश होऊन सरोगेट प्रोग्राममध्ये सामील होण्यास तयार होते. पण जेव्हा हाय-एंड सरोगेट सुविधेंबद्दल खुलासे समोर येतात तेव्हा गोष्टी गोंधळू लागतात. हा चित्रपट देखील आज 9 डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर हिंदीमध्ये प्रदर्शित झाला आहे. 

डॉक्टर जी (Doctor G)
बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केल्यानंतर, आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) आणि रकुल प्रीत सिंगचा (Rakul Preet Singh) ‘डॉक्टर जी’ (Doctor G) हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट एका पुरुष डॉक्टरच्या संघर्षाविषयी आहे. ज्याला orthopedics व्हायचे असते पण तो gynecologist होतो. त्यामुळे गोंधळ निर्माण होतो. या चित्रपटात शेफाली शाह (Shefali Shah) आणि शीबा चड्ढा (Sheeba Chaddha) यांच्याही प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटानं भारतात 25.45 कोटी रुपयांचा आणि जागतिक स्तरावर 40.71 कोटी रुपयांची कमाई केली तर या चित्रपटाचा बजेट हा 35 कोटी रुपयांचा होता. हा चित्रपट 11 डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. 

ब्लर (Blurr)
‘ब्लर’ हा अभिनेत्री तापसी पन्नूचा (Taapsee Pannu) निर्माता म्हणून पहिला चित्रपट असून ती देखील या चित्रपटात काम करत आहे. गुलशन देवैया (Gulshan Devaiah) यांची भूमिका असलेल्या ‘ब्लर’मध्ये ती जुळ्या बहिणींची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट एका बहिणीबद्दल आहे जी तिच्या जुळ्या बहिणीच्या मृत्यूमागचं खरं कारण शोधते आणि या प्रवासात अनेक सत्य उलगडतात. ‘ब्लर’ हा 2010 साली प्रदर्शित झालेल्या Julia’s Eyes या स्पॅनिश हॉरर चित्रपटचा रिमेक आहे. हा चित्रपट आज 9 डिसेंबर रोजी Zee5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे.

फाडू : एक प्रेमकथा (Faadu: A Love Story) 
ही दोन प्रेमींची कथा आहे ज्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. पावेलचे (Pavail Gulati) ही भूमिका झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीचं संघर्ष दाखवण्यात आलं आहे, तर सैयामीचे (Saiyami Kher) पात्र हे जमिनिला लागून असलेल्या व्यक्तीचे आहे. हा चित्रपट Sony LIV या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आज 9 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. 

हेही वाचा : Aamir Khan नं Ex-Wife किरण राव सोबत हिंदू परंपरेनं केली पूजा, Photo Viral

कॅट (CAT) 
CAT मध्ये, रणदीप हुड्डा (Randeep Hooda) हा गुरनाम सिंग ही भूमिका साकारताना दिसत आहे. हा ड्रग्सच्या तस्करीच्या प्लॅनमध्ये अडकलेला एक साधा आणि निष्पाप माणूस आहे.  तो काही शक्तिशाली लोकांच्या सहभागामुळे कोणत्या गोष्टींना सामोरे जातो हे यात दाखवण्यात आले आहे. वेब सीरिजमध्ये हसलीन कौर (Hasleen Kaur), गीता अग्रवाल (Geeta Aggarwal), दक्ष अजित सिंग (Dakssh Ajit Singh), जयप्रीत सिंग (Jaipreet Singh), सुखविंदर चहल (Sukhwinder Chahal), प्रमोद पठाल (Pramod Pathal), केपी सिंग (KP Singh) आणि काव्या थापर (Kavya Thapar) यांच्याही भूमिका आहेत. आज 9 डिसेंबर रोजी ही वेब सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *