Headlines

4 दात पडल्यानंतरही घेतला अप्रतिम झेल; चमिका करुणारत्ने म्हणतोय, मी पुन्हा येईन…

[ad_1]

Lanka Premier League : लंका प्रिमियर लीगमध्ये कॅच पकडताना एका खेळाडूचे दात पडल्याची बातमी बुधवारी समोर आली होती. तोंडावर बॉल लागूनही चमिका करुणारत्नेने झेल सोडला नाही. यादरम्यान चमिलाकाला मोठी दुखापत झालीय. कॅच पकडताना चमिकाचे चार दात पडले तर एकूण 30 टाके लागले आहेत. लंका प्रीमियर लीग (LPL) मध्ये गॅले ग्लॅडिएटर्स आणि कॅंडी फाल्कन्स यांच्यात झालेल्या सामन्यामध्ये हा प्रकार घडला. यावेळी चमिका करुणारत्नेने नुवानिंदू फर्नांडोचा अप्रतिम झेल घेतला (Chamika Karunaratne Viral Video). मात्र झेल घेताना चेंडू त्यांच्या तोंडावर आदळला.

चार दात तुटले तरी सोडला नाही कॅच

करुणारत्नेचे झेल पकडताना चार दात तुटले आहेत. चेंडू लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव देखील झाला. त्यानंतर करुणारत्नेनेला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. उपचारानंतर चमिका करुणारत्नेने सोशल मीडियावर स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे. या अपघातात चार दात तुटले आहेत आणि 30 टाके पडले आहेत, तरीही हसण्यास सक्षम आहे, असे करुणारत्नेने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये म्हटलं आहे.

“माझे 4 दात फुटले होते पण आता परत लावले आहेत. 30 टाके पडल्यानंतर मी अजूनही थोडेसे हसू शकतो. मी पुन्हा एकदा हसत पल्लेकेलेमध्ये नेहमीपेक्षा अधिक मजबूत स्थितीत मैदानात असेन! लवकरच भेटू,” असे करुणारत्नेने आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये म्हटले आहे.

Chamika Karunaratne post

पाहा व्हिडीओ-

कार्लोस ब्रॅथवेटच्या चेंडूवर, फर्नांडोला कव्हर्सवर ड्राईव्ह खेळायचा होता. पण त्याला तो योग्यवेळी खेळता आला नाही. चेंडू हवेत गेला आणि पॉइंटवर उभा असलेला करुणारत्नेने मागे धावत जात झेल घेतला. 

दरम्यान, गॅले ग्लॅडिएटर्स आणि कॅंडी फाल्कन्स यांच्यात झालेल्या सामन्यामध्ये कॅंडी फाल्कन्सने सामना पाच गडी राखून जिंकला. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *