Headlines

‘रात्रभर झोपू न देणारी दुःख…’ कुशल बद्रिकेची पोस्ट पाहून चाहते हैराण

[ad_1]

मुंबई : अभिनेता कुशल बद्रिके (Kushal Badrike) झी मराठीवरील चला हवा येवू द्या कार्यक्रमातून घरा-घरात पोहचला. आपल्या परफेक्ट कॉमेडी टाईमिंगने कुशलने चाहत्यांच्या मनावर गारुड घातलं आहे. चला हवा येऊ द्या’ च्या शोमुळे घराघरात पोहोचलेला कलाकार कुशल बद्रिके (Kushal Badrike).आपल्या नाविण्यपूर्ण अभिनयाने कायमच सर्वांना आनंद देत असतो.

अभिनेता सोशल मीडियावरही कायम सक्रिय असतो. नेहमी तो सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असतो. अभिनेत्याचं लिखाणं त्याच्या चाहत्यांना नेहमी आकर्षित करतं. नेहमी कुशल त्याच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट लिहत असतो. अशीच पोस्ट अभिनेत्या एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. जी चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

कुशलने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहीलंय की, ”रात्रभर झोपू न देणारी दुःख सुद्धा असतात माणसाला, मनातली तळमळ अंतरात उतरत जाते हळू…हळू …रात्रभर हे विचारांचं वादळ घेऊन आपलं ह्या कुशीवरून त्या कुशीवर, आणि त्या उशीवरून ह्या उशीवर .“वास्तुशास्त्रानुसार” झोपायच्या दिशा आणि जागा बदलून सुद्धा झोप लागत नाही. अश्या वेळी मग आपण स्वतःला बदलायचं. सुकून”

कुशलने ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर करताच ती चर्चेत आली आहे. कुशलची ही पोस्ट पाहून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करतायेत तर काहीजण मात्र त्याच्या या पोस्टनंतर चिंता व्यक्त करत आहेत. 
एका चाहत्याने कमेंट करत लिहीलं आहे की, ”दादा तुम्ही sirious बोलले तर तुमच्या आयुष्यात काही तरी sirious झाल अस वाटते…” तर अजून एकजण म्हणतोय, ‘दादा काही टेंशन आहे का’ तर अजून एकजण म्हणतोय, ‘एखाद्याची लेखणी इतकी सुंदर कशी काय असू शकते. त्या लेखणी मध्ये इतका #सुकून मस्तच ‘ अशा कमेंट्स त्याच्या पोस्टवर चाहत्यांनी केल्या आहेत.

कुशल कायम सोशल मीडियावर सक्रिय असतो. तो आपल्या चाहत्यांसोबत नेहमी पोस्ट शेअर करत असतो. दरवेळी कुशल त्याच्या मनातील भावना चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करतो. यावेळी देखील कुशलने एक पोस्ट शेअर केली आहे. जी पाहून चाहते चिंता व्यक्त करत आहेत.

कुशल कायम सोशल मीडियावर सक्रिय असतो. तो आपल्या चाहत्यांसोबत नेहमी पोस्ट शेअर करत असतो. दरवेळी कुशल त्याच्या मनातील भावना चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करतो.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *