Headlines

Vivaah Muhurat 2022-23:नोव्हेंबरमध्ये ‘या’ तारखेपासून सुरू होणार लग्नाचे शुभ मुहूर्त, जाणून घ्या

[ad_1]

मुंबई : हिंदू धर्मात (Hindu Religion) कोणत्याही शुभ कार्यापूर्वी शुभ मुहूर्त (Shubh muhurat) पाहण्याची परंपरा आहे. शुभ मुहूर्तावर केलेली शुभ कार्ये विना अडथळा पूर्ण होतात असा समज आहे. अशा परिस्थितीत लग्नाचा मुद्दा असेल तर शुभ मुहूर्ताची (Shubh muhurat 2022) विशेष काळजी घेतली जाते. त्यामुळे यंदाच्या वर्षी लग्न करणाऱ्या तरूण-तरूणींसाठी नेमके कोणते शुभ मुहूर्त आहेत, ते या बातमीत जाणून घेऊय़ात. 

हिंदू धार्मिक मान्यतेनुसार, देवशयनी एकादशीपासून (Devshayani Ekadashi)  पुढील चार महिने भगवान विष्णू निद्रा अवस्थेत असतात. अशा स्थितीत लग्नासारखे शुभ कार्य या काळात होत नाही. देवउठनी एकादशीच्या (Dev uthani Ekadashi 2022) दिवशी भगवान विष्णू (Lord Vishnu) झोपेतून जागे होतात आणि त्यानंतर शुभ कार्यक्रम सुरू होतात. यावर्षी देवउठनी एकादशी (Dev uthani Ekadashi) 4 नोव्हेंबर 2022 रोजी आहे. तेव्हापासून लग्नाचे मुहूर्त (Vivah Muhurat) सुरू होत आहेत. नोव्हेंबर 2022 ते मार्च 2023 पर्यंत लग्नासाठी शुभ मुहूर्त कधी आहेत ते पाहूयात. 

देवउठनी एकादशीला शुभ मुहूर्त नाही
हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, जेव्हा भगवान विष्णू (Lord Vishnu) योगनिद्रातून जागे होतात तेव्हा विवाह सोहळा सुरू होतो. यावेळी देवउठनी एकादशी  (Dev uthani Ekadashi) ४ नोव्हेंबरला आहे. देवउठनी एकादशीपासून लग्नासाठी शुभ मुहूर्त सुरू होत असला तरी यावेळी सूर्याची स्थिती लग्नासाठी योग्य मानली जात नाही. अशा परिस्थितीत यावेळी देवउठनी एकादशीच्या (Dev uthani Ekadashi) दिवशी लग्नासाठी शुभ मुहूर्त नाही.

नोव्हेंबर 2022 लग्नाचा मुहूर्त
21 नवंबर 2022
24 नवंबर 2022
25 नवंबर 2022
27 नवंबर 2022

डिसेंबर 2022 लग्नाचा मुहूर्त
2 दिसंबर 2022
7 दिसंबर 2022
8 दिसंबर 2022
9 दिसंबर 2022
14 दिसंबर 2022 

जानेवारी 2023 लग्नाचा मुहूर्त
15 जनवरी, 2023
18 जनवरी, 2023
25 जनवरी, 2023 
26 जनवरी, 2023 
27 जनवरी, 2023
30 जनवरी, 2023
31 जनवरी, 2023

फेब्रुवारी 2023 लग्नाचा मुहूर्त
6, 7, 9, 10, 12, 13, 14, 22, 23 और 28 फरवरी 2023

मार्च 2023 लग्नाचा मुहूर्त
6, 9, 11 और 13 मार्च 2023

(Disclaimer:  येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची पुष्टी करत नाही.)



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *