Headlines

Viral Video : आधी फोटो काढला अन् मग कानशिल्यात लगावली, अभिनेता प्रभाससोबत तरुणीचं धक्कादायक कृत्य

[ad_1]

Fan Slapped Prabhas on Airport : बाहुबली फेम अभिनेता प्रभास याच्यासोबत एअरपोर्टवर धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एअरपोर्टवर कलाकारांना कायम चाहत्यांचा सामना करावा लागतो. एखाद्या कलाकाराला एअरपोर्टवर पाहून चाहते फोटो काढण्यासाठी घोळका करतात. डॅशिंग आणि तरुणींच्या हृदयाचे ठोके चुकविणारा साऊथ इंडियन अभिनेत्या प्रभासला पाहून एक चाहती त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी गेली. फोटो काढल्यानंतर तिने प्रभासच्या कानशिल्यात लगावली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. (female fan slapped prabhas on airport old video again viral on social media)

खरं तर हा व्हिडीओ जुना असल्याचं बोलं जातं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार हा व्हिडीओ 2019 मधील आहे. प्रभास एअरपोर्टवर दिसला तेव्हा चाहत्यांनी त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी गर्दी केली होती. प्रभासनेही चाहत्यांसोबत फोटो काढले. या चाहत्यांच्या गर्दी एक तरुणी होती. तीही प्रभाससोबत फोटो काढण्यासाठी आली. तिने छान फोटो काढला आणि ती निघून गेली. पण जरा वेळानंतर ती परत आली आणि तिने प्रभासच्या गालाला हात लावला. 

आपल्या आवडत्या कलाकाराला पाहून चाहते कायम उत्साही होतात. प्रभासला पाहून तिनेही जरा सैरभैर झाली होती. फोटो काढल्यानंतर ती पुन्हा आली आणि तिने प्रभासच्या गालावर जोरदार चापटी दिली. हे पाहून सर्वांना धक्काच बसला. प्रभासलाही कळलं नाही की तिने असं का केलं. प्रभासने गाला हात लावला. तरुणीच्या या कृत्याने सगळं काही सेकंद निशब्द झाले होते. तिने प्रभासला मारल्यानंतर ती किंचाळली देखली. आनंदाच्या भरात तिने हे कृत्य केलं होतं. तिने खरं प्रभासला पाहिलं का म्हणून तिने त्याचा गालावर हात मारला.

फोटो काढणारे आणि तिथे उपस्थिती लोकांना वाटलं तिने प्रभासच्या कानाखाली मारलं. दरम्यान हा जुना व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील telugutiktok_official या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हायरल होतो आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *