Headlines

विकेंडला The Kerala Story पाहायचाय? तिकीट काढण्याआधी पाहा चित्रपटाचा Review

[ad_1]

The Kerala Story Review : आजकाल चित्रपट हे सत्य घटनेवर आधारीत किंवा मग ज्या गोष्टींविषयी जास्त बोलण्यात येत नाही त्यावर बनवतात. हे फक्त भारताविषयी नाही तर जगभरात कुठे काही मोठी घटना झाली की त्यावर देखील चित्रपट बनवण्यात येतात. बऱ्याच वेळा असे चित्रपट हे वादाच्या भोवऱ्यात अडकतात. असाच एक चित्रपट गेल्या काही दिवसांपासून The Kerala Story हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. त्यावरून सोशल मीडियावर अनेक वाद सुरु झाले होते. हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकण्याचं कारण हे त्यात सांगितलेला 30 हजार मुलींचा आकडा आहे. हा चित्रपट केरळमधील 30 हजार मुलींच्या आयुष्यावर आधारीत नाही तर 4 मुलींच्या आयुष्यावर आधारीत आहे. या चार मुलींचा धर्मपरिवर्तन करत त्यांच्या ISIS या दहशतवादी संघटनेत भरती करण्यात आलं याविषयी सांगण्यात आलं आहे. विकेंडला जर तुम्ही हा चित्रपट पाहण्याचा विचार करत असाल तर नक्कीच हा रिव्ह्यू वाचा.

चित्रपटाची पटकथा

चित्रपटाची पटकथा ही एका नर्सिंग कॉलेजमध्ये शिकणाऱ्या चार मुलींच्या आयुष्यावर आधारीत आहे. ज्यातील दोन मुली या हिंदू, एक ख्रिश्चन आणि एक मुस्लिम होत्या. तर एक हिंदू मुलगी शालिनीची भूमिका ही अदा शर्मानं साकारली असून तिला वडील नसतात. तिचं घर कॉलेजपासून खूप लांब असतं त्यामुळे ती आठवड्याच्या शेवटी देखील घरी जाऊ शकत नाही. दुसऱ्या हिंदू मुलगी गीतांजलि ही भूमिका सिद्धी इदनानीनं साकारली आहे. तिचे वडील हे समाजवादी असतात जे धर्माला अफूची गोळी समजतात. त्या दोघींना त्यांच्या धर्माविषयी जास्त माहित नसतं. तर ख्रिश्चन मुलगी निमाहची भूमिका ही योगिता बिहानीनं साकारलेली आहे. तर चौथी मुलगी आसिफा असते हे भूमिका सोनिया बलानीनं साकारली आहे. आसिफा ही आईएसआईएस चित्रपटासाठी काम करत असलेल्या एका मौलवी आणि त्याच्या गॅंगच्या संपर्कात असते आणि केरळच्या मुलींना लव्ह जिहादमध्ये अडकवत त्यांचे धर्मपरिवर्तन करते. इतकंच काय तर ती या मुलींना सीरिया पाठवते. आसिफाची नजर नंतर शालिनी, गीतांजलि आणि निमावर पडते आणि त्यानंतर तिच्या दोन मित्रांच्या मदतीनं ती शालिनी आणि गीतांजलिला फसवते. या सगळ्यात निमाह वाचते, तर शालिनी त्या मुलामुळे प्रेग्नंट होते आणि त्यानंतर तिचं धर्मपरिवर्तन करत तिला फातिमा नाव देण्यात येते, मग तिचं दुसऱ्याशी लग्न करत तिला सीरियाला पाठवण्यात येते. यापुढचा शालिनीचा प्रवास खूप खडतर होतो. तर इथे भारतात तिच्या दोन मैत्रिणी गीतांजलि आणि निमाहला देखील अनेक भयानक गोष्टींचा सामना करावा लागतो. 

हेही वाचा : Heeramandi Series पाहण्यासाठी उस्तुक असणाऱ्या चाहत्यांना करावी लागणार प्रतिक्षा!

चित्रपटाचं दिग्दर्शन

दिग्दर्शक म्हणून सुदीप्तो सेननं खूप चांगलं काम केलं आहे. त्यांनी चित्रपट पाहण्यासाठी नक्की पुढे काय झालं हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर होतात. सुदीप्तो सेननं जे फॅक्ट आहेत त्याला धरून चित्रपट बनवण्याचा खूप चांगला प्रयत्न केला आहे. चित्रपटात काही सीन हे खूप भयानक आहेत. सुदीप्तो त्याच्या चित्रपटांमध्ये ड्रामा कमी दाखवण्यासाठी ओळखला जातो. तर या चित्रपटात देखील त्यानं तेच केलं आहे. पण दुसरीकडे ज्या प्रकारे मुलींच ब्रेनवॉश करत त्यांच्याकडून हे सगळं काम करून घेण्यात आलं ते सगळं बालिश पद्धतीनं दाखवण्यात आल्याचं चित्र दिसत आहे. आसिफा आणि तिचे मित्र ज्या प्रकारे मुलींना फसवतात ते पटण्यासारंख वाटत नाही.  हॉस्पिटलमध्ये असलेल्या वडिलांवर गीतांजली थुंकते, शालिनी कोलंबोमध्ये सत्य माहीत होतं तरी ती सीरियाला जाते, असे अनेक सीन आहेत जे पटत नाहीत. 

कलाकारांच्या अभिनय

चित्रपटातील अदा शर्माच्या अभिनयानं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. तर अदाला या आधी कमांडो या चित्रपटात पाहिले आहे. त्या चित्रपटातील तिच्या अभिनयानंतर तिला अत्यंत विरोधी भूमिकेत पाहून प्रेक्षक आश्चर्यचकीत झाले आहेत. आसिफाची भूमिका साकारणाऱ्या सोनिया बलानीला आपण अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये पाहिले आहे. तक योगिता बिहानीला आपण हृतिक रोशनच्या ‘विक्रम वेधा’ या चित्रपटात चंदाच्या भूमिकेत पाहिले आहे. योगिता बिहानीनं दिलेलं स्पीच हे द कश्मीर फाइल्स चित्रपटातील दर्शन रावलच्या स्पीच सारखं वाटतं आहे. तर सिद्धी इदनानीनं गीतांजलि ही भूमिका उत्तम रित्या साकारली आहे. तिच्या भूमिकेचे अनेक शेड्स पाहण्यात आले होते. 

सिनेमेटोग्राफी

केरळ ते सीरिया आणि अफगानिस्तान, पाकिस्तानपर्यंत सगळ्या लोकेशन या रीयल असल्या पाहिजे याचा पूर्ण प्रयत्न सिनेमेटोग्राफर प्रशांतनु महापात्रनं केला आहे. जे लोक हा चित्रपट फक्त मनोरंजन म्हणून पाहतात त्यांना हा चित्रपट आवडणार नाही. पण ज्या लोकांना या चित्रपटातून नक्की केरळमध्ये त्या चार मुलींसोबत काय झालं होतं. हे जाणून घ्यायचं असेल त्यांना हा चित्रपट नक्की आवडेल. कारण या चित्रपटात असलेली गाणी देखील चित्रपटाच्या पटकथेला लागून आहेत. पण या चित्रपटाविषयी एक गोष्ट बोलायचे झाले तर त्यात सस्पेंस नाही. तुम्ही चित्रपट पाहतांना विचार कराल की असं होणार तसं होणार तर अखेर त्यातील बऱ्याचशा गोष्टी तुम्ही पुढे होताना पाहाल. अखेर हा चित्रपट कोणालाही टार्गेट करण्यासाठी बनवण्यात आला नाही हे अखेरमध्ये कळून येत आहे. 

Zee 24 Taas कडून The Kerla Story चित्रपटाला साडेतीन स्टार



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *