Headlines

विद्यार्थ्याकडून बारावीच्या परीक्षा शुल्कसाठी लाच, संस्थाचालक, प्राचार्यांसह तिघांविरुद्ध गुन्हा

[ad_1]

जालना –  बारावीच्या परीक्षा शुल्कपोटी  ४७५ एवजी तब्बल दीड हजार रुपये विद्यार्थ्याकडे मागणी करून लाच स्वीकारल्याप्रकरणी संस्थाचालक, प्रभारी प्राचार्य व प्रयोगशाळा सहाय्यकाविरोधात पारध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. नसीम अहमदखान ईस्माईल खान (वय ५७), शेख शोएब शेख महेबूब (३२) व पवन श्रीराम भोंबे, अशी गुन्हा दाखल झालेल्या लाचप्रकरणातील अनुक्रमे संस्थाचालक, प्रभारी प्राचार्य व प्रयोगशाळा सहायकाची नावे आहेत.

तक्रारदार विद्यार्थी बारावीच्या परीक्षेचे शुल्क भरण्यासाठी धावडा (ता. भोकरदन) येथील डॉ. नसीम उर्दू ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्यांकडे गेला. प्राचार्य शेख शोएब यांनी ४७५ रुपये शुल्काएवजी दीड हजार रुपये भरावे लागतील, असे सांगितले. तक्रारदार विद्यार्थी संस्थाचालक डॉ. नसीम खान यांच्याकडे गेला. त्यांनी दीड हजार रुपये भरावे लागतील असे सांगत विद्यार्थ्याकडून रक्कम घेण्याचे  सांगून प्राचार्यांना प्रोत्साहन दिले. तर प्राचार्य शेख शोएब यांनी प्रयोगशाळा सहायक पवन भोंबे याला दीड हजार रुपये शुल्कापोटी घेण्याचे आदेश दिले. रक्कम पवन भोंबे याने स्वीकारली, अशी माहिती जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उप अधीक्षक सुदाम पाचोरकर यांनी दिली. लाचप्रकरणाची कारवाई पोलीस निरीक्षक एस. एस. शेख, ज्ञानदेव झुंबड, गणेश चेके, गजानन कांबळे, गणेश बुजाडे, जावेद शेख, शिवाजी जमधडे, ज्ञानेश्वर म्हस्के यांच्या पथकाने केली. 

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *