Headlines

Video : ‘पतली कमरिया बोले हाय हाय’ गाण्यावर Bhau Kadam च्या लेकीचा भन्नाट डान्स

[ad_1]

Mrunmayee Kadam Dance Video With Bhau Kadam Viral : झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hava Yeu Dya) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक आहे. या कार्यक्रमातील कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिकंली आहेत. आपल्या विनोदाने सर्वांना हसायला लावणारा विनोदवीर भाऊ कदम (Bhau Kadam) कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आपल्या सेलिब्रिटीच्या कुटुंबाबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक असतात. आता भाऊ कदमच्या लेक मृण्मयी (Mrunmayee) सध्या चर्चेत आहे. मृण्मयीनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

मृण्मयीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत मृण्मयी वडील भाऊ कदम आणि कुटूंबासोबत डान्स करताना दिसत आहे. मृण्मयीनं ‘पतली कमरिया बोले हाय हाय’ या गाण्यावर कुटुंबासोबत डान्स करताना दिसत आहे. मृण्मयीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ शेअर करत कुटुंबासोबत हे करायचेच होते, असे कॅप्शन मृण्मयीनं दिले आहे. 

मृण्मयी ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. मृण्मयी ही एक व्हिडीओ क्रिएटर आहे. मृण्मयी वडील भाऊ कदमला व्लॉग एडिट करायला मदत करते. इतकंच नाही तर भाऊ कदमला टेकनॉलॉजीशी ओळख करून देण्याचा मृण्मयी प्रयत्न करते. मृण्मयी ही सध्या कॉलेजमध्ये असून शिक्षण घेत आहे. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मृण्मयीनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. तो व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला होता. त्याचं कारण रणवीर सिंग होता. व्हिडीओमध्ये मृण्मयी रणवीरसोबत सेल्फी काढताना दिसत आहे. शिवाय रणवीरने मृण्मयीसोबत गप्पा देखील मारल्या. रणवीरसोबत खास व्हिडीओ शेअर करत मृण्मयीने आपल्या भावना देखील व्यक्त केल्या आहेत.  

हेही वाचा : Sonam Kapoor नं BKC मधील आलिशान फ्लॅट विकला, मोजून घेतली तगडी रक्कम

रणवीरसोबतचा व्हिडीओ शेअर करत मृण्मयी म्हणाली, “माझं स्वप्न अखेर सत्य झालं. रणवीरकडे खूप काही शिकण्यासारखं आहे. तो फक्त एक अभिनेता नाहीतर एक व्यक्ती म्हणून देखील उत्तम आहे. माझ्या आयुष्यात सर्वात खास व्यक्तीला मी भेटली. ही भेट माझ्या वडिलांमुळेच शक्य झाली. ही गोष्ट मी कधीही विसरू शकत नाही…” मृण्मयीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

दरम्यान, ‘चला हवा येऊ द्या’ कार्यमात अनेक सेलिब्रिटी त्यांच्या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी येत असतात. रणवीर देखील त्याच्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी ‘चला हवा येऊ द्या’ कार्यमात आला होता. रणवीर सिंग ‘सर्कस’ चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी येथे आला होता.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *