Headlines

VIDEO : निक जोनसनं ‘मान मेरी जान…’ गाणं गाताच ‘जीजू जीजू’ ओरडे लागले चाहते!

[ad_1]

Nick, Joe, Kevin Jonas Brothers Performance In Mumbai : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राचा पती आणि लोकप्रिय अमेरिकन गायक निक जोनस भारतात आला आहे. ‘द जोनस ब्रदर्स’ भारतात टूर करण्यासाठी आले आहेत. त्या टूरची सुरुवात ही मुंबईपासून झाली आहे. ‘द जोनस ब्रदर्स’ पहिल्यांदा भारतात परफॉर्म करण्यासाठी आले आहेत. यावेळी निकला पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चांगलीच गर्दी केली होती. जेव्हा तो स्टेजवर आला तेव्हा तिथे उपस्थित असलेले सगळेच जीजू-जीजू ओरडू लागले. त्याचे अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.  

‘द जोनस ब्रदर्स’ यांनी लोलापालूजा म्यूजिक फेस्टिव्हलच्या पहिल्या दिवशी शनिवारी जबरदस्त परफॉर्म करत तिथे आलेल्या सगळ्या चाहत्यांचे लक्ष वेधले. निक जोनस, जो जोनस आणि केविन जोनस यांनी ऑडियन्ससमोर त्यांचे सगळे हिट ठरलेली गाणी गायली. निकनं त्याच्या चाहत्यांना एक सरप्राईज देखील दिलं आहे. त्यानं ‘मान मेरी जान…’ हे गाणं देखील गायलं. त्याचं हे गाणं ऐकताच त्याचे चाहते त्याला ‘जीजू जीजू’ बोलू लागले. भारतातील त्यांचा असा हा पहिलाच कॉन्सर्ट होता, त्यांचा भारतात असलेला हा डेब्यू आपण बोलू शकतो. 

निक जोनस त्याच्या भावांसोबत त्यांची हिट गाणी गायल्यानंतर ‘तू मान मेरी जान…’ गाणं गायलं. त्यावेळी तिथे असलेल्या सगळ्या चाहत्यांना फार आनंद झाला. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावेळी निक जोनससोबत किंगनं स्टेज शेअर करताना दिसला. त्याशिवाय ते दोघं हे गाणं गात असताना एन्जॉय करताना दिसले. कॉन्सर्टमध्ये निकंनं पिवळ्या रंगाचं कॉर्ड सेट परिधान केलं आहे. तर किंगनं पांढऱ्या रंगाचं टी-शर्ट आणि सिल्वर शायनिंग जॅकेट परिधान केलं आहे. 

हेही वाचा : ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान सलमानचा जुना व्हिडीओ व्हायरल! म्हणाला होता ‘अभिषेक हा…’

जोनस ब्रदर्सशिवाय स्टिंग, हाल्से, रॉयल ब्लड, अमेरिकन रॅपर JPEGMAFIA, फ्रेंच हाउस डीजे मल्ला आणि वन रिपब्लिक म्यूजिक फेस्टिवलच्या दुसऱ्या दिवशी परफॉर्म करणार आहेत. या म्युजिक फेस्टिव्हलमध्ये दुसऱ्या दिवशी परफॉर्म करणार आहेत. फेस्टिव्हलमध्ये भारतीय कलाकारांचे देखील प्रोग्राम असणार आहेत. त्यात अनुष्का शंकर, द रघु दीक्षित प्रोजेक्ट, प्राभ दीप, कमाक्षी खन्नासोबत इतर काही कलाकार आहेत. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *