Headlines

Video : ‘ होय, मी बीफ खातो…’, Ranbir Kapoor नंतर ‘या’ सेलिब्रिटीचं धक्कादायक वक्तव्य

[ad_1]

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. त्याच्या आगामी ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटावर बऱ्याच दिवसांपासून बॉयकॉट करण्याची मागणी चाहते करत आहेत. आता त्याचे काही जुने व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यात रणबीरचा एक 11 वर्ष जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत रणबीरनं त्याला बीफ प्रचंड आवडतं असा धक्कादायक खुलासा केला होता. त्यानंतर आता ‘द काश्मिर फाइल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी देखील बीफ आवडत असल्याचं म्हटलं आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

विवेक अग्नीहोत्रींचा हा व्हिडिओ रणबीर कपूर आणि त्याच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या समर्थकांनी सोशल मीडियावर शोधून काढला आहे. आता विवेक अग्निहोत्रीचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये विवेक म्हणतायत की, ‘मी हेही लिहिले आहे की तुम्हाला उत्तम बीफ कुठे मिळेल, मी अनेक गोष्टी लिहिल्या आहेत, मी अगोदरही बीफ खायचो आणि अजूनही खातो. माझ्या आयुष्यात काहीही बदलले नाही.’ 

आणखी वाचा : Queen Elizabeth II च्या आमंत्रणाला अमिताभ बच्चन यांनी दिला होता नकार, जाणून घ्या कारण

हा व्हिडिओ शेअर करत ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या समर्थकांनी कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘हे लोक तुम्हाला विवेक अग्निहोत्रींचा हा व्हिडिओ कधीही दाखवणार नाहीत, जो स्वतः बीफ खाणारा आहे आणि ही त्यांची वैयक्तिक चॉइस आहे. कारण ते त्यांच्या अजेंड्यात बसत नाही, पण तुम्ही लोक या लोकांपासून दूर रहा आणि तिकीट खरेदी करून थिएटरमध्ये ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचा आनंद घ्या.’

आणखी वाचा : Aishwarya Rai Troll : वय लपवण्यासाठी ऐश्वर्यानं असं काय केलं की होतेय ट्रोल, पाहा फोटो

दुसरीकडे विवेक अग्नीहोत्रींना काही नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. एक नेटकरी म्हणाला,’बीफ खाणारे हे लोक आपल्या हिंदू धर्मावर चित्रीकरण करतील हे मान्य नाही. उद्या विवेक अग्निहोत्री यांनी हिंदू देवदेवतांवर चित्रपट काढला तर नक्कीच बहिष्कार टाकला जाईल.’ नेटकऱ्यांनी अशा अनेक कमेंट केल्या आहेत. 

आणखी वाचा : Video : आलियाला मिळणाऱ्या चित्रपटांच्या ऑफर्सवर ऐश्वर्या जळते? हे काय बोलून गेली

रणबीरच्या वक्तव्याबद्दल बोलायचं तर 2011 मध्ये रणबरीनं ‘रॉकस्टार चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी आपल्याला बीफ खायला आवडतं असा खुलासा केला होता. ‘माझं कुटुंब पेशावरचं आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत पेशावरी खाद्यसंस्कृतीही इथे आली आहे. मी मटण, पायाही खातो. मी बीफचा चाहता आहे,’ असं रणबीर म्हणाला होता. ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर हा जुना व्हिडीओ पुन्हा व्हायरल झाला होता.

आणखी वाचा : Kissing Scene तोसुद्धा इतका कठीण, की टॉपच्या अभिनेत्याला द्यावे लागले 80 टेक

सोशल मीडियावर बॉयकॉट ब्रह्मास्त्र हे हॅशटॅग सुरु असूनही अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाची अॅडव्हान्स बुकिंग केली होती. असे म्हटले जाते की बुधवारी या चित्रपटासाठी 18 कोटी रुपयांची अॅडव्हान्स बुकिंग झाली आहे. हा चित्रपट चित्रपटगृहात 2डी आणि 3डी तं प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात रणबीर व्यतिरिक्त आलिया भट्ट (Alia Bhatt), अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), नागार्जुन (Nagarjuna), मौनी रॉय (Mouni Roy) महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *