Headlines

Video : केकवर दारु ओतल्यानंतर लावली आग; ‘जय माता दी’ म्हणणारा रणबीर ट्रोलर्सच्या निशाण्यावर

[ad_1]

Ranbir Kapoor Christmas Party: कपूर कुटुंबाकडून दरवर्षीप्रमाणं यंदाच्या वर्षीसुद्धा नाताळच्या निमित्तानं एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. दरवर्षी कपूर कुटुंबीय ख्रिसमसच्या दिवशी एकत्र येत Family Lunch चा आनंद घेतात. या सेलिब्रिटी कुटुंबातील सर्व मंडळींचा यावेळी एकच कल्ला पाहायला मिळतो. लहान, मोठे प्रत्येक सदस्य या पार्टीमध्ये धमाल करताना दिसतात. यंदाचं वर्षही यासाठी अपवाद ठरलं नाही. 

कपूर कुटुंबाच्या ख्रिसमस पार्टीच्या निमित्तानं यंदाच्या वर्षी विषेश चर्चा झाली ती म्हणजे अभिनेता रणबीर कपूर याची लेक राहाची (Raha Kapoor). इतके दिवस राहाला माध्यमांच्या नजरेपासून दूर ठेवणाऱ्या रणबीर आणि आलियानं ख्रिसमसच्या (Christmas 2023) निमित्तानं तिला सर्वांसमोर आणलं आणि त्यानंतर सुरुवात झाली, Kapoor Family च्या पार्टीला. 

कुटुंबासमवेत खास क्षण अनुभवणाऱ्या या सर्वच कपूर मंडळींनी पार्टीनंतर अनेक फोटो आणि व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडियावरून शेअर केले. इतकंच नव्हे तर, पार्टीतील काही व्हिडीओ फॅन पेजवरही व्हायरल झाले. यामध्ये एका व्हिडीओनं सर्वांच्या नजरा वळवल्या. सुरुवातीला हा व्हिडीओ पार्टीतील गमतीचा भाग म्हणून पाहिला गेला. पण, त्यानंतर मात्र त्याच व्हिडीओमुळं रणबीरवर नेटकऱ्यांनी कडाडून टीका केली. 

 

व्हिडीओमध्ये नेमकं काय? 

व्हिडीओमध्ये रणबीर डायनिंग टेबलवर बसलेला दिसत असून, त्याच्याच शेजारी आलियासुद्धा दिसत आहे. तिथं कुटुंबातील इतरही मंडळी आहेत, कारण त्यांचा आवाज आणि कल्ला व्हिडीओमध्ये ऐकू येतोय. त्याचवेळी कुटुंबातील एक सदस्य तिथं असणाऱ्या स्पाँज केकवर दारूची बाटली उपडी करताना दिसतोय. तो असं करत असताना मागून कोणीतरी त्याला, ‘आणखी ओत…’ असंही सांगत होता. इथं रणबीर केकला स्मोकी फ्लेवर देण्यासाठी म्हणून लाइटरनं तो पेटवतो आणि या साऱ्यामध्ये  ‘जय माता दी’ असं म्हणत गंमत करताना दिसतो. 

fallback

रणबीरनं केलेली ही धमाल, तिथं सुरु असणारा कल्ला हे सर्व ठीक, पण त्याचं हे चुकीच्या वेळी  ‘जय माता दी’ बोलणं अनेकांनाच रुचलेलं नाही. त्यामुळंच नेटकऱ्यांनी जिथंजिथं हा व्हिडीओ दिसेल त्या त्या अकाऊंटवर व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन रणबीरवर ताशेरे ओढले आहेत. ‘भानावर आहे का हा…’, ‘दारू आणि जय माता दी… काय मूर्खपणा आहे’ या आणि अशा कमेंट करत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. धमाल मस्ती करण्याच्या नादात रणबीर खरंच चुकलाय का? तुम्हाला काय वाटतं? 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *