Headlines

Vastu Tips: वास्तुनुसार मोबाईलवर ठेवा वॉलपेपर, सकारात्मक उर्जेचा मार्ग होईल मोकळा

[ad_1]

Mobile Wallpaper Vastu: सध्या तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकाच्या हाती स्मार्टफोन पाहायला मिळतो. एका क्लिकवर आपल्याला जगभरातील घडामोडींची माहिती मिळते. त्यामुळे स्मार्टफोन हा प्रत्येकाचा जीव की प्राण असतो. त्यामुळे स्मार्टफोन व्यवस्थित राहावा यासाठी स्क्रिनगार्डसह मोबाईलला कव्हर घातलं जातं. याचबरोबर आपल्या मोबाईलच्या वॉलपेपरचं इतरांवर प्रभाव पडावा म्हणून साजेशं चित्र ठेवलं जातं. वास्तुशास्त्रानुसार विचित्र वॉलपेपरमुळे तुमच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता असते. त्यामुळे वॉलपेपरमध्ये वास्तुनुसार आवश्यक बदल केल्यास अनेक समस्यांपासून मुक्ती मिळू शकते. तसेच तुमच्या करिअरवरही सकारात्मक प्रभाव पडू शकतो. आर्थिक परिस्थितीतही बदल दिसून येईल. यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये वास्तुशास्त्रानुसार वॉलपेपर लावावे लागतील.

मोबाइल वॉलपेपर 

मोबाईलचा वॉलपेपर आपण दिवसातून शेकडो वेळा पाहतो. साहजिकच त्या वॉलपेपरचा आपल्या विचार आणि उर्जेवर परिणाम होतो. जर वॉलपेपर पाहिल्याबरोबर आपण सकारात्मक उर्जा जाणवली, तर त्याचा आपल्या विचारशक्तीवर चांगला परिणाम होतो. आज आपण जाणून घेऊयात कोणत्या प्रकारच्या समस्येवर मात करण्यासाठी मोबाईलमध्ये कोणते वॉलपेपर लावले पाहिजेत.

करिअर-व्यवसाय प्रगतीसाठी वॉलपेपर: जर तुम्हाला तुमच्या नोकरी-व्यवसायात अडकल्यासारखे वाटत असेल किंवा तुमच्या इच्छेनुसार प्रगती होत नसेल, तर तुम्ही मोबाईल वॉलपेपरमध्ये पायऱ्या चढत असलेल्या व्यक्तीचे चित्र टाकू शकता. यामुळे तुमच्या मनात सकारात्मकता निर्माण होईल आणि तुम्हाला पुढे जाण्यास खूप मदत होईल.

मनःशांतीसाठी वॉलपेपर: तुमचे मन नेहमी अशांत असेल, तर तुमच्या मोबाइल वॉलपेपरमध्ये पावसाच्या पाण्याचे सुखदायक चित्र ठेवा. याशिवाय, वॉलपेपरमध्ये योगाभ्यासाचे चित्र टाकणे देखील चांगले राहिल.

वैवाहिक जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी वॉलपेपर: वैवाहिक जीवनात किंवा प्रेम संबंधात समस्या असल्यास वॉलपेपरमध्ये गुलाबाचे चित्र लावा. यामुळे तणाव दूर होऊन प्रेम वाढण्यास मदत होईल.

नवीन नोकरी मिळवण्यासाठी वॉलपेपर: जर तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल किंवा तुम्हाला प्रमोशन मिळवायचे असेल तर मोबाईलच्या वॉलपेपरवर हिरवळीचे चित्र लावा. हिरवा रंग यशाचे प्रतीक आहे.

पैशाच्या टंचाईपासून मुक्ती मिळवण्यासाठी: जर पैशाची चणचण असेल, तर तुमच्या मोबाईलच्या वॉलपेपरमध्ये ब्लेसिंग बुद्धाचे चित्र लावल्याने खूप फायदा होईल. यामुळे तुमचे उत्पन्न वाढवण्यास मदत होईल आणि प्रगतीचे नवीन मार्ग देखील मिळतील.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE24TAAS याची पुष्टी करत नाही.)



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *