Headlines

डिप्रेशनवर मात केलेल्या Urmila Nimbalkar ने सांगितल्या Mental Health च्या 5 टिप्स

[ad_1]

Urmila Nimbalkar Mental Health Tips : मानसिक आरोग्य दिन (World Mental Health Day) दरवर्षी 10 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. मानसिक आरोग्याबाबत लोकांना जागरुक करणे हा त्यामागचा उद्देश आहे. आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत जे कोणत्या ना कोणत्या कारणाने तणाव, चिंता आणि नैराश्याला बळी पडतात, परंतु त्याबद्दल बोलण्यास कचरतात. या गोष्टींचा सामना आपण आंतरिकरित्या करत असतो आणि त्यामुळे आपण अनेक शारीरिक समस्यांना बळी पडतो.

या सगळ्यावर अभिनेत्री आणि यूट्यूब क्रिएटर उर्मिला निंबाळकरने एक व्हिडीओ शेअर केला आहे. स्वतः उर्मिला डिप्रेशनच्या फेजमधून गेली आहे तिने या सगळ्यावर कशी मात केली आणि कोणत्या 5 गोष्टी किंवा सवयी आपण स्वीकारल्या पाहिजेत, याबाबत तिने सांगितलं आहे.

(फोटो सौजन्य – Urmila Nimbalkar Instagram / iStock)

फरगेट आणि फरगिव्ह 

विसरा आणि माफ करा हे आनंदी आणि निवांत राहण्याचं गुपित आहे. जीवनविद्या मिशनचे श्री प्रल्हाद पै म्हणतात की, ‘समोरच्याला माफ करा आणि आपल मन साफ करा.’ याचा अर्थ असा की, एखादी घटना एकदा घडते आणि आपण त्याचा सतत विचार करून आपलं मन खराब करतो. अशावेळी आपण घडलेल्या प्रकारामुळे समोरच्या व्यक्तीला माफ करायचं आणि आपलं डोकं शांत ठेवायचं. 

काम सोपवायला शिका

डेलिगेशन की सक्सेस.. उर्मिला म्हणते की, काम सोपवलं की आपण थोडे शांत होतो. सगळ्याच गोष्टी आपण करायला पाहिजेत का? तर त्याचं उत्तर नाही आहे. आपण मदतनीस ठेवले किंवा छोट्या छोट्या गोष्टींसाठी इतरांची मदत घेतली तर त्याच काहीच चुकीचं नाही. उलट अशावेळी आपल्याला थोडा आराम मिळतो ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी. महिलांना स्वतः सगळं करायला आवडतं, असा एक चुकीचा समज केला आहे. त्यामुळे महिलांना मदत केली तर चालेल आणि महिलांनी देखील ती करून घ्यावी. 

सल्ला मागताना लाज वाटणे

अनेकदा लोकं सल्ला घेत नाही. पण ही चांगली गोष्ट नाही. सल्ला घेणे यामध्ये काहीच कमीपणा नाही. कारण अनेकदा आपण त्या विचार करण्याच्या मनःस्थितीत नसतो, अशावेळी सल्ला घेणे कायमच फायद्याचे ठरते. 

कुणी टाळलं तर 

Fear Of Missing Out अशी एक संकल्पना आहे. आपल्याला सगळ्यांनीच चांगल म्हणावं किंवा आपल्याला सगळ्यांनीच मान द्यावा ही अपेक्षा ठेवणे म्हणजेच एक प्रकारचा अंहकार आहे. आपण आपल्याकडे जे आहे त्यामध्ये आनंदी राहावं. म्हणजे कुणी बोलावलं नाही तर दुःखी होत नाही. प्रत्येकाने आपल्यावर प्रेम करायलाच पाहिजे हा अट्टाहास नको. 

मग यावर उपाय काय? 

सर्वात आधी तर घडलेली घटना स्वीकारा. मग काहीही असो.. अगदी आपल्या अपमानापासून… ते कुणी आपलं नातं नाकारेपर्यं सारं काही. शांत-निवांत झालात की, तुमचं डोकं चालायला सुरूवात होते. मग काय करावं? यावर विचार करू शकतो.  



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *