Headlines

union-minister-ramdas athawale-allegations sanjay-raut-broke-shiv-sena | Loksatta

[ad_1]

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले(Ramdas Athawale) यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर पक्षात फूट पाडल्याचा आरोप केला आहे. शरद पवारांनी नाही तर संजय राऊतांनीच शिवसेना फोडली असल्याचा आरोप आठवलेंनी केला आहे. एवढचं नाही तर उद्धव ठाकरे यांनी राऊत यांच्या सांगण्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती केली असल्याची टीकाही आठवलेंनी केली आहे.

हेही वाचा- “जब वक्त बुरा चल रहा हो, तो…”, संजय राऊतांचं सूचक ट्वीट; शायरीच्या माध्यमातून बंडखोरांना टोला!

रामदास कदम यांचा शरद पवारांवर आरोप
यापूर्वी महाराष्ट्राचे माजी मंत्री रामदास कदम यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना फोडल्याचा आरोप केला होता. तसेच पवारांनी पद्धतशीरपणे शिवसेना पक्ष कमकुवत केला असल्याची टीकाही कदमांनी केली होती.उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मंत्र्यांसोबत बसावे, हे आम्हाला कोणालाच मान्य नव्हते. एकनाथ शिंदे यांनी हे पाऊल उचलले नसते तर शिवसेनेकडे १० आमदारही शिल्लक राहिले नसते. मी ५२ वर्षे पक्षात काम केले पण शेवटी मला काढून टाकण्यात आले. एकनाथ शिंदे गटातील आमदारांचे कदमांनी आभार मानले आहेत.

हेही वाचा- शरद पवारांचा मोठा निर्णय, राष्ट्रीय पातळीवरील सर्व विभाग आणि सेल बरखास्त

राष्ट्रवादीशी युती बाळासाहेबांच्या विचारांच्या विरोधात

उद्धव ठाकरे भारतीय जनता पक्षासोबत युती करण्यासाठी तयार होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत याबाबत तासभर बैठक चालली पण काही शिवसेना आमदारांच्या विरोधामुळे ही युती होऊ शकली नसल्याचे शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी स्पष्ट केले. तसेच शिवसेना राष्ट्रवादीसोबत गेल्यावर हे बाळासाहेब ठाकरेंच्या निर्णयाच्या विरोधात असल्याचं मी म्हटलं होतं. सुरुवातीला उद्धव ठाकरेंनी भाजपासाोबत युती करत उपमुख्यमंत्रिपद स्वीकारलं असतं, तर एवढा विरोध झाला नसता असंही शेवाळे म्हणाले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *