Headlines

Uddhav Thackeray will meet farmers for 24 minutes Abdul Sattar criticized msr 87

[ad_1]

शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या भेटीसाठी आजपासून मराठवाडा दौऱ्यावर आहेत. यावरून भाजपाने त्यांच्यावर टीका केलेली असताना, आता राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनीही निशाणा साधला आहे.

मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, “मी त्यांच्या दौऱ्यातील मिनीट टू मिनीट कार्यक्रम पाहिला त्यानंतर असं दिसून आलं की २४ मिनिटांसाठी ते शेतकऱ्यांची विचारपूस करणार आहेत. आता यावेळेत ते किती पाहातील, काय पाहातील, किती ओला दुष्काळ पाहातील.”

…याची जबाबदारी घेऊन आज शेतकऱ्यांसमोर माफी मागणार का? – उद्धव ठाकरेंना भाजपाचा सवाल!

याशिवाय “मला हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार आता परतीचा पाऊस संपलेला आहे. उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीने दौरा काढला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानेल. किमीत कमी यंदा तरी अडीच वर्षानंतर त्यांचा दौरा शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत येऊ लागला, याबद्दल त्यांना धन्यवादच द्यावे लागतील. २२-२४ मिनिटं का असेना पण आले पाहणी करतील आणि ज्या सूचना ते मांडतील त्याबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री निश्चितच विचार करतील.” असंही सत्तार म्हणाले.

याचबरोबर “मी स्वत:चं कौतुक करत नाही, परंतु मी ६९ तालुके आणि विशेषता ९ जिल्हे फिरलो हे सर्व माध्यमांनी दाखवलं. जेव्हापासून मी पदभार स्वीकारला, तेव्हापासून मेळघाट ते मराठवाड्याच्या शेवच्या टोकापर्यंत, कोकणापासून ते उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रापर्यंत अशाप्रकारे ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. सकाळी ७ वाजेपासून ते कधीकधी रात्र होत परंतु शेतकऱ्यांशी मी चर्चा करतोय. शेतकऱ्यांनी अजिबात निराश होऊ नये, त्यांच्या पाठिशी महाराष्ट्र सरकार आहे.” असंही सत्तार यांनी यावेळी सांगितलं.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *