Headlines

India vs Pakistan: “अगले जनम में जीतेगा…”, भारत पाकिस्तान सामन्यापूर्वी दोन्ही संघाचे चाहते भिडले; पाहा Video

[ad_1]

T20 World Cup 2022 India vs Pakistan: टी 20 वर्ल्डकपमधील हायव्होल्टेज सामना सुरु होण्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी उरला असताना स्टेडियमबाहेर दोन्ही संघाचे चाहते भिडले. मागच्या टी 20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्ताननं भारताला पराभूत केलं होतं. आता त्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी संधी भारतीय संघासमोर आहे.ऑस्ट्रेलियातील मेलबर्न मैदानावर हा सामना रंगणार आहे. या मैदानाबाहेरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या सामन्यावर पावसाचं सावट असूनही चाहत्यांचा उत्साह काही कमी झालेला नाही. 

पाकिस्तानी संघाच्या चाहत्यांनी भारतीयांना पाहून डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यांनी “जीतेगा भाई जीतेगा, पाकिस्तान जीतेगा” अशी घोषणाबाडी केली. त्याला भारतीय चाहत्यांनी जशाच तसं उत्तर दिलं. “अगले जानम में…” असं सांगत बोलती बंद केली. या प्रत्युत्तरामुळे पाकिस्तानी चाहत्यांचा चांगलाच संताप झाला. 

भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, दीपक हुड्डा.

पाकिस्तानी संघ
बाबर आजम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, फखर झमान, शान मसूद, मोहम्मद नवाज, खुशदिल शाह, आसिफ अली, हैदर अली, इफ्तिखार अहमद, हारिस रौफ, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, मोहम्मद वसीम, शादाब खान, मोहम्मद हसनैन



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *