Headlines

uday samant replied to shivsena criticism on eknath shinde by samana editorial spb 94

[ad_1]

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सतत दौरे आणि राजकीय मेळाव्यांत व्यस्त असून ‘कॅबिनेट टू कॅबिनेट’च मंत्रालयात हजेरी लावतात, अशी टीका आज ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून करण्यात आली होती. या टीकेला शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

हेही वाचा – “एकनाथराव, आम्ही कर भरून आमच्या चौकशा, तुमच्या चौकशा का होत नाहीत?”, नाना पाटेकरांच्या थेट प्रश्नावर फडणवीस म्हणाले…

काय म्हणाले उदय सामंत?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे किमान आठ दिवसांतून एकदा मंत्रालयात येतात, हे सामनाने मान्य केले आहे. त्यामुळे यापेक्षा जास्त मला बोलायची आवश्यकता नाही, असा टोला उदय सामंत यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना लगावला आहे. एकनाथ शिंदे यांच्यावरील टीका वाचताना मला पौराणिक आणि ऐतिहासिक कथा वाचल्यासारख वाटतं. महाभारत, रामायण, आदिलशाहा, अफजलखान, औरंगजेब, कोथळा काढा असे शब्द प्रयोग ऐतिहासिक आणि पौराणिक नाटकांमध्ये असायचे. ते पुन्हा एकदा महाराष्ट्राला बघायला मिळत आहेत, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – पंतप्रधानांची नक्कल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “कायदा माझ्या बापाने…”

‘सामना’तून एकनाथ शिंदेंवर टीका

सततचे दौरे आणि राजकीय मेळाव्यांत व्यस्त असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या ‘कॅबिनेट टू कॅबिनेट’च मंत्रालयात हजेरी लावतात. बुधवारी मंत्रीमंडळ बैठक आटोपल्यावर थेट पुढच्या बुधवारी मंत्रालयात येतात. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यांमुळे प्रशासकीय कामे मोठ्या प्रमाणावर रखडून पडत असल्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे, अशी टीका सामनातून करण्यात आली होती.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *