Headlines

“…त्या दिवशी भाजपा बंडखोरांना बाजूला करेल”; शिंदे गटासंदर्भात उद्धव ठाकरेंचं भाकित | the day BJP realises these people are of no use to it it will dump them Uddhav Thackeray on rebels scsg 91

[ad_1]

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीमध्ये शिवसैनिकांना सभासद संख्या वाढवण्याला प्राधान्यक्रम देण्याचं आवाहन केलं आहे. सध्या राज्यामध्ये सुरु असणाऱ्या घडामोडींऐवजी सभासद वाढवण्यावर आपण भर दिला पाहिजे असं उद्धव यांनी जिल्हा प्रमुखांना मार्गदर्शन करताना म्हटलं आहे. तसेच यावेळी उद्धव यांनी लोकांचे प्रेम आपल्यासोबत असून बंडखोरांविरोधात लोकांच्या मनात संताप असल्याचंही म्हटलं आहे. बंडखोरांबद्दल भाष्य करता उद्धव ठाकरेंनी बंडखोरांना भाजपापासून दूर लोटलं जाण्याची शक्यताही व्यक्त केली.

नक्की पाहा >> Photos: “उद्धव आणि आदित्य ठाकरेंच्या आदेशानेच पवारांवर पातळी सोडून टीका”; बापाचा उल्लेख करत अजित पवारांनी इशारा दिलेल्या नेत्याचा गौप्यस्फोट

जिल्हा प्रमुखांच्या बैठकीमध्येही उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा देणाऱ्या बंडखोरांचा उल्लेख चोर असा केला. हे बंडखोर शिवसेनेची निशाणी चोरण्याचा प्रयत्न करत आहेत असं उद्धव ठाकरे म्हणाले. “हा खेळ काही काळ सुरु राहील. मी सुद्धा आमदार आणि खासदारांना खोल्यांमध्ये कोंडून घेतलं असतं. मात्र आम्ही तसं केलं नाही. तसं वागणं लोकशाहीला धरुन ठरलं नसतं,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

नक्की वाचा >> “जसं काही त्यांचं…”; नातवाचा उल्लेख करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलेल्या टीकेवरुन उद्धव ठाकरेंना टोला

“मी पदाधिकाऱ्यांना अजूनही सांगतोय की जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. कोणीही येथे राहून नाटकं करण्याची किंवा रडायचं सोंग आणू नयेत. तुम्ही येथे (पक्षात असताना) सर्व फायदे घेतले. त्यामुळे आता तुम्ही रडायचं सोंग आणू शकत नाही. त्यांनी माझ्याकडे पदांची मागणी केली असती तर मी ती दिली असती. मात्र तुम्ही काही हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत असेल तर मी शांत बसणार नाही. त्यांना त्यांची जागा दाखवून देईन,” असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच उद्धव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना प्रतिज्ञापत्र भरुन देण्याचं आवाहन केलं.

नक्की वाचा >> “घोटाळे करायचे तुम्ही, लफडी करायची तुम्ही आणि…”; ‘फाईल्स उघडल्याने गद्दारी केली’ म्हणत आदित्य ठाकरेंची बंडखोरांवर टीका

“आता ते सत्तेची फळं उपभोगतील. मात्र ज्या दिवशी भाजपाला हे लोक आता उपयोगाचे नाहीत असं वाटेल तेव्हा त्यांना बाजूला केलं जाईल. सध्याचा हा कठीण काळ जाऊ देणं हाच (आपल्यासमोरील) मार्ग आहे. सध्या सभासद संख्या वाढवण्यावर आणि प्रतिज्ञापत्रांवर लक्ष केंद्रीत करुयात. राज्याच्या राजकारणात काय सुरु आहे याकडे लक्ष देऊ नका. लोक आपल्यासोबत आहेत. त्यांना आपल्याबद्दल सहानुभूती आणि प्रेम आहे. बंडखोरांबद्दल लोकांच्या मनात संताप आहे. शिवसेनाला पुन्हा नव्याने उभं करण्याची हीच संधी आहे. आपण ५० लाख प्रतिज्ञापत्रांचा टप्पा पूर्ण केला की आपण मुंबईत एकत्र बैठकीसाठी भेटूयात,” असं उद्धव म्हणाले.

नक्की वाचा >> “७० वर्षांचा असूनही…”, रामदास कदमांनी बोलून दाखवली आदित्य ठाकरेंना ‘साहेब’ म्हणावं लागल्याची खंत; म्हणाले, “दीड वर्ष माझ्या…”

जिल्हा प्रमुखांच्या बैठकीआधी मंगळवारी दुपारी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनमध्ये उत्तर भारतीय महासंघाच्या प्रतिनिधींची बैठक घेतली.  भाजपाला शिवसेना संपवायची असल्याने ते कोंबड्यांची झुंज लावावी तसे शिवसेना आणि त्यातून फुटणाऱ्यांची झुंज लावत आहेत. झुंजीत एक कोंबडा मेला की दुसऱ्याला मारून टाकतील अशी टीका यावेळी उद्धव यांनी केली. तसेच कितीही बाण पळवले तरी धनुष्य माझ्याकडेच आहे, असा इशारा ठाकरे यांनी भाजपा-शिंदे गटाला दिला.

नक्की वाचा >> “भाजपामध्ये आता मूळच्या हिंदुत्ववाद्यांपेक्षा अशा…”; १२ खासदारांनी शिंदेंना पाठिंबा दिल्यानंतर शिवसेनेची आगपाखड

कितीही संकटे आली तरी संघर्ष करू, पुन्हा पक्ष नव्याने उभा करू, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.  या संकटाच्या काळात उत्तर भारतीय महासंघाचे पदाधिकारी तुमच्याबरोबर आहोत, अशी ग्वाही पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना दिली.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *