Headlines

‘तुम्ही बच्चू कडूंना घरात घुसून मारेन का म्हणालात?’ रवी राणांनी दिलं उत्तर, म्हणाले “जर तलवारीने कोथळा काढत…” | Ravi Rana on threatening Bachchu Kadu after meeting with Deputy CM Devendra Fadnavis sgy 87

[ad_1]

राज्यात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला अपक्ष आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वादाला पूर्णविराम मिळाला असताना आता नव्याने वाकयुद्ध सुरु झालं आहे. रवी राणा यांनी घरात घुसून मारण्याची भाषा केल्याने बच्चू कडू समर्थकही आक्रमक झाले आहेत. दरम्यान रवी राणा यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी वाद मिटल्याचा दावा करत, विधानाचा चुकीचा अर्थ लावला असल्याचं म्हटलं आहे.

“वाद पूर्णपणे मिटला आहे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे आदेश आमच्यासाठी सर्वस्व आहेत. म्हणून बैठकीनंतर लगेचच मी तो वाद मिटल्याचं जाहीर केलं,” असं रवी राणा म्हणाले.

“पहिली वेळ असल्याने माफ करतो” म्हणणाऱ्या बच्चू कडूंना रवी राणांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “दम दिला तर घरात घुसून…”

‘घरात घुसून मारेन’ वक्तव्यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले, ते वक्तव्य कोणासाठी नव्हतं. कोणी जर आम्हाला मारु, कोथळा काढू, हात छाटून टाकू, तोंड रंगवू असं धमकावत असेल, त्यांच्यासाठी हे वक्तव्य होतं. ते वक्तव्य कोणालाही उद्देशून नव्हतं. कोणी जर तलवारीने आमचा कोथळा काढत असेल, मारुन टाकत असेल तर जीव वाचवण्यासाठी ते करावं लागतं.

काय म्हणाले होते रवी राणा –

बच्चू कडू यांनी अमरावतीत झालेल्या सभेत बोलताना पहिली वेळ असल्याने रवी राणा यांना माफ करतो असं विधान केलं होते. यावर रवी राणा यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. “हा वाद आता मिटला आहे. पण कोणी मला दम देत असेल, तर ते योग्य नाही. रवी राणाने उद्धव ठाकरेंचा दम मोजला नाही. त्यामुळे बच्चू कडू माझ्यासाठी छोटा विषय आहे. बच्चू कडू जर दम देऊन बोलत असेल, तर त्यांना जशास तसं उत्तर देण्यासाठी मी सक्षम आहे”, अशी प्रतिक्रिया रवी राणा यांनी दिली होती.

“कोणत्या चौकात…”, बच्चू कडू यांचा रवी राणांना प्रतिइशारा; म्हणाले, “मी मरण्यासाठी तयार”

“प्रेमाच्या भाषेवर रवी राणा एकदा नाही, तर १० वेळा माघार घेण्यास तयार आहे. पण कोणी दम देऊन बोलत असेल, तर त्याला घरात घुसून मारण्याची हिंमतही माझ्यात आहे”, अशा इशाराही त्यांनी बच्चू कडू यांना दिला.

नवनीत राणांची प्रतिक्रिया

“मला त्या विषयावर काही बोलायचं नाही. हा माझा विषय नाही. माझ्यासाठी माझं काम महत्त्वाचं असून, मी त्यासाठी जात आहे,” असं त्यांनी मुंबईला निघण्याआधी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. “देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आमचे नेते आहेत. ज्याप्रमाणे ते बोलतात त्यापमाणे आम्ही करतो,” असंही त्यांनी सांगितलं.

“मी घरी त्यांची पत्नी आहे, पण बाहेर सेवक आहे,” असं सांगत त्यांनी वादावर अधिक भाष्य करण्यास नकार दिला. वादामुळे जनतेचे प्रश्न मागे पडत आहेत असं विचारलं असता “ते सिनिअर आहेत, त्यांना माझ्यापेक्षा जास्त कळतं,” असं त्या म्हणाल्या.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *