Headlines

“तुम्हाला कधी कळलं की तुम्ही मुख्यमंत्री होणार आहात? आमच्यासारखं अचानक की…”; शिंदे हसून म्हणाले, “मी जी हिंमत…” | CM Eknath Shinde On Becoming Chief Minister of Maharashtra by support of BJP scsg 91

[ad_1]

राज्यातील संत्तांतरणाला तीन महिन्यांहून अधिक कालावधी झाला आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पार्टीच्या समर्थनाने राज्यात शिंदे सरकारची स्थापना केली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ शिंदेंच्या शपथविधी सोहळ्यामध्येच घेतली. या सर्व सत्तासंघर्षामध्ये मुख्यमंत्रीपद शिंदेंना देण्याचा निर्णय अनेकांना धक्का देणार ठरला. ३० जून रोजी दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये फडणवीस यांनी शिंदेंना मुख्यमंत्री पद दिलं जाणार असल्याची घोषणा केली आणि भाजपाचं धक्कातंत्र पुन्हा चर्चेत आलं. मात्र शिंदे मुख्यमंत्री होणार असल्याचं त्यांना स्वत:ला कधी कळलं यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता मुख्यमंत्र्यांनी आपल्याला हे पद का देण्यात आलं असावं याबद्दल भाष्य केलं आहे.

नक्की वाचा >> ‘वेदान्त-फॉक्सकॉन’, ‘टाटा एअरबस’ प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला का गेले? गडकरी म्हणाले, “कारण नसताना लोक राज्यांवरुन…”

“सर्वात मोठा पक्ष असूनही (भाजपाने) वेगळा विचार केला. जे २०१९ मध्ये केलं नाही त्यांनी ते आता करण्याचं ठरवलं. त्यांनी तुम्हाला मुख्यमंत्री बनवलं. तुम्हाला कधी कळलं की तुम्ही मुख्यमंत्री होणार आहात?” असा प्रश्न शिंदेंना विचारण्यात आला. ‘इंडिया टुडे कॉनक्लेव्ह’मधील मुलाखतीमध्ये हा प्रश्न ऐकताच मुख्यमंत्री शिंदेंना हसू आलं. आमच्याप्रमाणे तुम्हालाही अचानकच ही माहिती मिळाली का? आमच्याप्रमाणे तुम्हालाही धक्का बसला का? अरे हे तर काहीतरी वेगळं घडलं असं वाटलं का? अशाच पद्धतीने तुम्हालाही कळलं की तुम्हाला आधीपासून ठाऊक होतं?” असा प्रश्न मुख्यमंत्री शिंदेंना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी, “मी आधी सुद्धा सांगितलं आहे की काही मिळवण्यासाठी किंवा पदासाठी हे पाऊल उचललं नाही. आमचे आमदार फार चिंतेत, रागात आणि नाराज होते की ते पाहून मी हे पाऊल उचललं,” असं सांगितलं.

भाजपाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काळजावर दगड ठेऊन हा निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे. ते तुम्ही ऐकलं असेल असं म्हणत शिंदेंना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शिंदेंनी, “तुम्ही त्याचं दुसरं विधान ऐकलं नसेल. त्यांनी दुसरं विधानही केलं होतं. त्यांनी विधान दुरुस्त केलं होतं,” असं उत्तर दिलं. “भाजपामध्ये वरिष्ठ नेत्यांचा निर्णय हा अंतिम असतो. त्यांनी जो निर्णय घेतला तो विचारपूर्व घेतला आहे. मला संधी दिली. आम्ही चांगलं काम करत आहोत,” असं शिंदेंनी सांगितलं.

नक्की वाचा >> ‘शिंदे गट’ भाजपामध्ये जाणार का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘भाजपाचा मुख्यमंत्री’ असा संदर्भ देत म्हणाले, “आम्ही लोक…”

आपल्याला मुख्यमंत्रीपद का देण्यात आलं यासंदर्भातील भाष्यही शिंदेंनी यावेळी केलं. “मी जे (बंडाचं) पाऊल उचललं आहे ते छोटं पाऊल नाही. मी जी हिंमत दाखवली आहे ती पाहून त्यांनी विचार केला असेल हा हिंमत असणारा माणूस आहे. हा लढाऊ वृत्तीचा माणूस आहे. या व्यक्तीला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री बनवावं असं त्यांना वाटलं असेल,” असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. पुढे मुख्यमंत्री शिदेंनी पंतप्रधान मोदींनी जगभरात भारताचा डंका वाजवल्याचं सांगत त्यांचे आभार मानले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि देवेंद्र फडणवीस या सर्वांनीच आम्हाला सहकार्य केलं, असंही शिंदे म्हणाले.

“मोठी खाती म्हणजे गृह, ऊर्जा, अर्थ ही उपमुख्यमंत्र्यांकडे आहेत. शिवसेनेविरुद्ध लढण्यासाठी भाजपा तुम्हाला पुढे करत आहे. तुम्ही उद्धव ठाकरेंविरोधात लढा आम्ही सरकार चालवायचा प्रयत्न करु असा भाजपाचा विचार असल्याचं टीकाकर म्हणतात,” असं म्हणत शिंदेंना यासंदर्भात काय वाटतं असं मुलाखतकाराने विचारलं. त्यावर मुख्यमंत्र्यांनी, “जे लोक असा विचार करत आहेत किंवा लोकांचा जो समज होता की भाजपाचा मुख्यमंत्री करण्यासाठी तोडफोड सुरु आहे तो मूळ विचारच चुकीचा ठरला. भाजपाला हवं असतं तर त्यांनी तेव्हाच त्यांचा मुख्यमंत्री बसवला असता,” म्हणत प्रतिक्रया नोंदवली.

नक्की वाचा >> ‘वेदान्त-फॉक्सकॉन’, ‘टाटा एअरबस’ प्रकल्प गुजरातला गेल्यासंदर्भात CM शिंदे म्हणाले, “मोदींनी मला सांगितलं की, शिंदेजी हे…”

“माझं देवेंद्रजींबरोबर छान ट्युनिंग आहे. मी यापूर्वीही त्यांच्याबरोबर काम केलं आहे. ते पाच वर्ष मुख्यमंत्री असताना मी काम केलं आहे. त्यामुळे त्यांच्या अनुभावाचा सरकार चालवताना फायदा होत आहे,” असंही शिंदे म्हणाले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *