Headlines

तुमच्या नावावर असलेले कन्फर्म रेल्वे तिकीट सहज करू शकता इतरांना ट्रान्सफर, पाहा स्टेप्स

[ad_1]

नवी दिल्ली: Transfer Confirm Ticket:तुमच्याकडे कन्फर्म रेल्वे रिझर्वेशन तिकीट असेल. पण, जर काही कारणास्तव तुम्ही तुमचा प्रवास करण्याचा विचार बदलला असेल तर, हे तिकीट दुसऱ्याला ट्रान्सफर करण्याचा पर्याय आहे. विशेष म्हणजे, रेल्वेतर्फे एक सेवा देण्यात येते. त्याअंतर्गत तुम्ही तुमचे तिकीट दुसऱ्याला ट्रान्सफर करू शकता. यासाठी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. तिकीट ट्रान्सफर करण्यासाठी प्रथम तुम्हाला ही विनंती ट्रेनच्या नियोजित सुटण्याच्या वेळेच्या किमान २४ तास आधी करावी लागेल. त्यानंतर, तिकिटावरील प्रवाशाचे नाव हटवले जाईल आणि ज्या सदस्याच्या नावावर तिकीट ट्रान्सफर करायचे आहे आहे त्याचे नाव टाकले जाईल

वाचा: Jio SIM यूजर्स द्या लक्ष, स्मार्टफोनमध्ये हे Bands नसल्यास काम करणार नाही 5G, ‘असे’ करा चेक

तिकिट ट्रान्सफर फक्त एकदाच केले जाऊ शकते. म्हणजे, जर प्रवाशाने त्याचे तिकीट दुसर्‍या व्यक्तीकडे एकदा ट्रान्सफर केले असेल, तर ते तिकीट नंतर इतर कोणालाही ट्रान्सफर करता येत नाही. यासाठी तिकिटाचे प्रिंटआउट घ्या. जवळच्या रेल्वे स्टेशनच्या आरक्षण काउंटरला भेट द्या. तुम्ही ज्या व्यक्तीला तिकीट हस्तांतरित करू इच्छिता त्या व्यक्तीचे ओळखपत्र सोबत ठेवा. जसे की आधार किंवा मतदार ओळखपत्र. तिकीट ट्रान्सफरसाठी काउंटरवर अर्ज करा. ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही बुक केलेल्या तिकिटांसाठी रेल्वे तिकिटांचे ट्रान्सफर शक्य आहे.

वाचा: Wi-Fi स्मार्टफोनशी कनेक्टेड असूनही Internet काम करत नसेल तर, वापरा या टिप्स, लगेच होईल काम

ज्या व्यक्तीला तिकीट ट्रान्सफर करायचे आहे. त्याला स्टेशन व्यवस्थापक/मुख्य आरक्षण पर्यवेक्षकाशी संपर्क साधावा लागेल आणि त्या उद्देशासाठी अर्ज सादर करावा लागेल. ज्या व्यक्तीकडे तिकीट हस्तांतरित केले जाईल त्या व्यक्तीसह त्याला त्याच्या ओळखपत्राची छायाप्रत देखील सादर करावी लागेल. ओळखपत्र म्हणून तुम्ही रेशन कार्ड, मतदार आय-कार्ड, बँक पासबुक, आधार कार्ड इत्यादी देऊ शकता.

कन्फर्म तिकीट रद्दीकरण शुल्काचे नियम काय आहेत? ट्रेन सुटण्याच्या ४८ तास आधी तिकीट रद्द केल्यास, या दरांनुसार प्रति प्रवासी रद्द करण्याचे शुल्क कापले जाईल.

एसी फर्स्ट/एक्झिक्यूटिव क्लास- २४० रुपये + सेवा कर, प्रथम श्रेणी / एसी 2 टियर -२०० रुपये + सेवा कर, AC चेअर कार / AC 3 टियर / AC 3 इकॉनॉमी – १८० रुपये + सेवा कर, स्लीपर क्लास – १२० रुपये, द्वितीय श्रेणी – ६० रुपये. ट्रेन सुटण्याच्या१२ तास आधी ४८ तासांच्या दरम्यान तिकीट रद्द करण्यासाठी सादर केले असल्यास, २५ % भाडे आकारले जाते. हे कलम 1(a) मध्ये दिलेल्या किमान रद्द करण्याच्या नियमानुसार केले जाते.

वाचा: Smartphone Buying: दिवाळीत स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर बजेट सोबत ‘या’ गोष्टींकडेही द्या लक्ष, होणार फायदा

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *