Headlines

‘तुला हव ते बोल, पण सर नको’, महेंद्र सिंह धोनी ‘या’ खेळाडूला असं का म्हणाला?

[ad_1]

मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार कॅप्टन कुल माही महेंद्र सिंह धोनी हा मैदानावरही आणि मैदानाबाहेरही कुलचं दिसला आहे. संध्या तो मैदानापासून दुर असला तरी, तरूण खेळाडूंना दिलेल्या मार्गदर्शनामुळे तो नेहमीच चर्चेत असतो. कारण अनेक खेळाडू त्याने दिलेल्या अमुल्य योगदानाचा किस्सा सांगत असतात. असाच एक किस्सा आता टीम इंडियातील एका खेळाडूने सांगितला आहे. 

महेंद्रसिंह धोनीच्या कर्णधारपदाखाली टीम इंडियाने 2 विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. या त्याच्या कार्यकाळात त्याने अनके खेळाडूंना त्याने घडवलं, अनेकांना अमुल्य मार्गदर्शन केले. याच मार्गदर्शनामुळे आता अनेक तरूण खेळाडू आपल्या यशाचे श्रेय धोनीला देताना दिसतात. 

चहलने सांगितल किस्सा
युजवेंद्र चहल एका यूट्यूब शो ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्सशी संवाद साधत होता. या संवादात त्याने माही बद्दलचा किस्सा सांगितला आहे. ‘मला महान एमएस धोनीकडून एकदिवसीय कॅप मिळाली. तो एक दिग्गज आहे. मी त्याच्यासोबत पहिल्यांदा खेळलो. मला त्याच्यासमोर बोलताही येत नव्हते. तो इतका छान बोलतो की तो खरोखर महेंद्रसिंग धोनी आहे का, असा प्रश्न पडतो, असे चहल म्हणाला.  

चहलला जून २०१६ मध्ये झिम्बाब्वेच्या दौऱ्यात एकदिवसीय सामन्यात डेब्यू केला होता. यावेळी त्याला धोनीकडून एकदिवसीय कॅप मिळाली होती आणि नंतर त्याला इंग्लंडविरुद्ध T20 मध्ये संधी देण्यात आली होती.

चहल पुढे म्हणाला, ‘जेव्हा मी त्याला झिम्बाब्वेमध्ये पहिल्यांदा भेटलो तेव्हा मी त्याला माही सर म्हणायचो. नंतर त्याने मला फोन केला आणि म्हणाला माही, धोनी, महेंद्रसिंग धोनी किंवा भाऊ, तुला पाहिजे ते बोल. पण सर नाही. महेंद्रसिंग धोनीच्या या स्वभावाचा युझवेंद्र चहल प्रभावित झाला होता.  

आयपीएल कामगिरी
राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्याने 17 सामन्यात 27 बळी घेतले. तो आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक विकेट घेणारा फिरकी गोलंदाज ठरला. त्याच्या धोकादायक खेळामुळे त्याने पर्पल कॅप जिंकली.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *