Headlines

‘एकही विट माझ्या मालकीची…’ जेव्हा शशांक केतकरला कळलं ‘त्या’ घराचं सत्य

[ad_1]

Shashank Ketkar : शशांक केतकरची अनेकदा चर्चा रंगलेली असते. यावेळी त्याची वेगळ्याच एका कारणासाठी चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा रंगली आहे. त्याची ‘स्कॅम 2003’ ही वेबसिरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. त्यामुळे त्याची जोरात चर्चा रंगलेली आहे. त्याची ही पहिलीच हिंदी वेबसिरिज आहे. आपण या नव्या वेबसिरिजमध्ये आपण काम करतो आहोत याबद्दल त्यानं सोशल मीडियावरून माहिती दिली होती त्यामुळे तेव्हापासून त्याची चांगलीच चर्चा रंगलेली होती. आता त्याची ही वेबसिरिज अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. काही दिवसांपुर्वी आपण एका खोट्या प्रॉडक्शन हाऊससोबत काम करतो आहोत, वर त्यानं एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात त्यानं म्हटलं होतं की तो एका खोट्या निर्मात्यासोबत काम करतो आहे आणि सोबत त्याची फसवणुकही झाली आहे व तिथल्या निर्मात्यांनी त्याचे पैसेही बुडवले आहेत. आता त्यानं आपल्यासोबत झालेल्या आणखी एका फसवणूकीबद्दल सांगितले आहे. 

शशांकनं काही दिवसांपुर्वी एका प्रोडक्शन हाऊसनं आपली फसवणूक केली असल्याचे सांगितले होते. आपण त्यांचा प्रोजेक्ट पुर्ण केला असून त्याला त्याचा कुठलाच मोबदला मिळाला नसल्याचे त्यानं सांगितले आहे. त्याला आपण केलेल्या कामाचा 20 टक्केही मोबदला मिळाला नसल्याचे त्यानं सांगितले आहे. त्यामुळे त्याची सगळीकडे चर्चा रंंगली होती. त्यातून त्यानं ही पोस्ट फार मुद्देसुद अशी शेअर केली होती. त्यामुळे त्याची ही पोस्टही सर्वत्र व्हायरल झाली होती. आता चर्चा आहे ती म्हणजे त्याच्यासोबत झालेल्या एका घराच्या घोटाळ्याची. त्यानं नुकत्याच एका वृत्तपत्राला मुलाखत दिली आहे त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली आहे. त्यात त्यानं आपल्यासोबत झालेल्या या घोटाळ्याविषयी सांगितली आहे. 

हेही वाचा : बिवाली अवली कोहली अडकणार लग्नबंधनात? ‘या’ अभिनेत्यासोबत केला फोटो शेअर, नेटकरी म्हणाले, ‘जमलंय तुमचं?’

याच मुलाखतीत तो म्हणाला की, ”मी 2013 मध्ये मीरा रोडमध्ये एका घराची नोंदणी केली होती. आता त्याला 10 वर्ष उलटली आहे. पण या 10 वर्षात एकही वीट माझ्या मालकीची झालेली नाही. इथे बिल्डरला काही मजल्यांची परवानगी मिळाली होती. त्यावर त्याने दहा-वीस मजले बांधले आहेत. मीरा रोड शहरात वीस-वीस मजली इमारत उभी राहते आणि ती कोणाच्या नजरेस पडत नाहीत का?” असा प्रश्न त्यानं यावेळी उपस्थित केला आहे. 

एवढंच नाही तर चित्रपटसृष्टीतही अनेकदा फसवणुकीला सामोरे जावे लागते. आम्ही असा सिनेमा देऊ, अशी भूमिका देऊ अशी आमिष दाखवायची. काम पूर्ण करून घ्यायचे. पैसे पुढच्या टप्प्याचे असतात ते द्यायचेच नाही. फोन उचलायचेच नाही. कारणं सांगत राहायची. हाही एक घोटाळाच झाला. खऱ्या आयुष्यात आम्ही अशा घोटाळ्यांचा सामना करत असतो, असं तो म्हणाला. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *