Headlines

विजय देवरकोंडा 1 कोटी दान करणार; फ्लॉप चित्रपटाचे निर्माते म्हणाले ‘आमचे 8 कोटी बुडवलेस, इतके पैसे असतील तर…’

[ad_1]

दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) हा सध्या समांथासह (Samantha Ruth Prabhu) मुख्य भूमिकेत असणाऱ्या ‘खुशी’ (Khushi) चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगलं यश मिळत आहे. फक्त तीन दिवसांत चित्रपटाने जगभरात 70 कोटींची कमाई केली आहे. यानंतर विजय देवरकोंडाने चित्रपटातील आपल्या कमाईतील काही भाग दान करणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्याच्या या निर्णयाचं कौतुक होत असताना, दुसरीकडे त्याच्या एका चित्रपटाचे निर्माते मात्र नाराज झाले आहेत. आमच्यासह एक्झिबिटर्स आणि डिस्ट्रिब्यूटर्स यांच्या कुटुंबानाही वाचव अशी आर्त हाकच त्यांनी दिली आहे. हा सगळा नेमका काय प्रकार आहे हे समजून घ्या. 

विजय देवरकोंडाची पैसे दान करण्याची घोषणा

विजय देवरकोंडाने घोषणा केली आहे की, तो चित्रपटातून मिळालेल्या कमाईतील काही भाग चाहत्यांना दान करत खुशी चित्रपटाला मिळालेलं यश साजरं करणार आहे. खुशी चित्रपट 1 सप्टेंबर रोजी जगभरातील थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. प्रदर्शित झाल्यानंतर तीन दिवसांत जगभरात चित्रपटाने 70 कोटींहून अधिक कमाई केली आहे. रोमँटिक कॉमेडी असणाऱ्या या चित्रपटात समांथा रुथ प्रभू देखील मुख्य भूमिकेत आहे.

विशाखापट्टणम येथील एका कार्यक्रमात विजय देवरकोंडाने म्हटलं की, “माझा आनंद तुमच्यासोबत वाटून घेण्यासाठी मी 100 कुटुंबांना 1 कोटी रुपयांचे वाटप करण्याची घोषणा करत आहे. 100 कुटुंबांना प्रत्येकी 1 लाख रुपये मिळतील. हे पैसे माझ्या वैयक्तिक खात्यातील आहेत”. 

चित्रपट समीक्षक मनोबाला विजयबालन यांनी ट्विटरला विजय देवरकोंडा ही घोषणा करत असल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी लिहिलं आहे की, “विजय देवरकोंडा पुढील 10 दिवसांत प्रत्येकी 100 कुटुंबांना 1 लाख रुपये देणार आहे. म्हणजेत एकूण 1 कोटी रुपये”

World Famous Lover च्या निर्मात्यांचं ट्विट

विजय देवरकोंडाने 1 कोटी दान करण्याची घोषणा केल्यानंतर अभिषेक पिक्चर्सने ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी विजय देवरकोंडाची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘वर्ल्ड फेमस लव्हर’ चित्रपटाचा उल्लेख केला आहे. 2020 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आमचं 8 कोटींचं नुकसान झालं, पण कोणीही मदत केली नाही असं सांगत त्यांनी विजय देवरकोंडाला मदत करताना आमचाही विचार करा अशी गळ घातली आहे. 

विजय देवरकोंडाचा वर्ल्ड फेमस लव्हर 2020 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात राशी खन्ना, पवन कल्याण, ऐश्वर्या राजेश आणि कॅथरीन ट्रेसा यांच्याही भूमिका होत्या. क्रिएटिव्ह कमर्शिअल्सच्या बॅनरखाली वर्ल्ड फेमस लव्हरला के.ए. वल्लभ यांनी पाठिंबा दिला होता. क्रांती माधव दिग्दर्शित चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. त्यानंतर आता वर्ल्ड फेमस लव्हर्सचे वितरण अधिकार असणाऱ्या अभिषेक पिक्चर्सने 8 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचे उघड केलं आहे.

ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “प्रिय विजय देवरकोंडा, वर्ल्ड फेमस लव्हरच्या वितरणात आम्ही 8 कोटी गमावले, पण कोणीही त्यावर काही बोललं नाही. पण आता तू तुझ्या मोठ्या मनाने कुटुंबांना 1 कोटी दान करत असताना विनंती आणि आशा आहे की, तू आम्हाला, आमचे प्रदर्शक आणि वितरकांच्या कुटुंबीयांनाही वाचवशील. धन्यवाद”.  यावेळी त्यांनी माणुसकी, प्रेम आणि सहानुभुती असे हॅशटॅगही वापरले आहेत. 

विजय देवरकोंडा आता मृणाल ठाकूरसोबत पुढील चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाला सध्या VD13 असं नाव देण्यात आलं आहे. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *