Headlines

‘द फ्लॅश’मध्‍ये बॅरीच्‍या रुममध्‍ये दिसले हनुमानजी; Adipurush च्या VFX ला विसरून जाल!

[ad_1]

Hanuman Poster In The Flash Movie: नुकताच मोठ्या पडद्यावर ‘ट्रान्सफॉर्मर्स: राइज ऑफ द बीस्ट’ या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. तर दुसरीकडे  दिग्दर्शक ओम राऊत (Om Raut) यांचा रामायणावरील आदिपुरुष (Adipurush) हा बहुचर्चित चित्रपट मोठ्या प्रतिक्षेनंतर भेटीला आला आहे. मात्र वीएफएसमुळे (VFX) चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. मात्र, पहिल्याच दिवशी चित्रपटाविषयी नेगेटिव्ह रिव्ह्यू येऊ लागल्याने चित्रपट आठवडाभर देखील चालणार नसल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. अशातच आता सोशल मीडियावर एका चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. सुपरहिरोंच्या चाहत्यांसाठी ‘द फ्लॅश’ (The Flash) हा चित्रपट विशेष लक्षवेधी ठरत आहे. 

फ्लॅश, बॅटमॅन आणि सुपरगर्ल हे ‘द फ्लॅश’ या चित्रपटात (The Flash Movie) एकत्र दिसणार असल्यानं चाहते उत्सुक झाले आहेत. 3 सुपरहिरोंना एकत्र आणणाऱ्या या चित्रपटाची चाहते गेले अनेक महिने वाट पाहत होते. अशातच आता ‘द फ्लॅश’ सोशल मीडियावर अचानक ट्रेंड होतोय. त्याला कारण ठरतंय चित्रपटातील एक सीन. ‘द फ्लॅश’ सिनेमामध्ये बॅरी ऍलन एझरा मिलरच्या (Barry) भूमिकेत परतला. या चित्रपटातील हनुमानाचं पोस्टराचं दृश्य सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Viral) होत आहे.

आणखी वाचा – टीकेचा भडीमार होत असतानाही Adipurush ने पार केला 150 कोटींचा आकडा; मोडला ‘पठाण’ आणि ‘ब्रम्हास्त्र’चा रेकॉर्ड

‘द फ्लॅश’ सिनेमातील हा सीन पाहिल्यानंतर चाहत्यांनी या चित्रपटातील हनुमानाचं पोस्टर दिसणारा सीन तुफान व्हायरल (Viral Seen) केलाय. व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये, बॅरी आयरिस वेस्ट कियर्सी क्लेमन्ससोबत बसलेला दिसतोय. एका हातात डोंगर उचललेला पोस्टर अनेकांच्या घरी लावलेला असेल. हाच पोस्टर चित्रपटाच्या सीनमध्ये दाखवण्यात आला आहे. त्यामुळे सध्या ट्विटरवर हा सीन तुफान ट्रेडिंगमध्ये असल्याचं दिसतंय. 

पाहा चित्रपटातील तो सीन

दरम्यान, चित्रपटात हनुमानजीचे (Hanuman Poster) पोस्टर का दाखवण्यात आले आहे हे अद्याप कळलं नाही. ‘द फ्लॅश’ हा सिनेमा 15 जूनला रिलीज झालाय. तर दुसरीकडे भारतात आदिपुरूष हा सिनेमा 16 जूनला रिलीज करण्यात आलाय. ट्विटरवर जय श्री रामच्या घोषणा देत सध्या द फ्लॉश ट्रेंड होत असल्याचं दिसतंय.

बॉक्स ऑफिस कलेक्शन

‘आदिपुरुष’ने पहिल्या दिवशी एकूण 87 ते 90 कोटींची कमाई (Adipurush Box office collection) केल्याचा अंदाज आहे. महत्त्वाचं म्हणजे मल्टिप्लेक्ससह सिंगल स्क्रीनवरही चित्रपट जोरदार कमाई करत आहे. मात्र, रिटिंग पाहून चित्रपट चालेल का? असा सवाल आता उपस्थित केला जातोय.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *