Headlines

Ranbir Kapoor च्या हाती कुऱ्हाड; Animal चा Pre Teaser पाहून वाढली चित्रपटाची उत्सुकता

[ad_1]

Animal Pre Teaser Video: रणबीर कपूरच्या आगामी Animal चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आली आहे. हा या चित्रपटाचा प्री-टीझर आहे. दोन दिवसांपुर्वी या चित्रपटाचा प्री-टीझर प्रदर्शित झाला असून या टीझरला प्रेक्षकांचा तूफान प्रतिसाद आला आहे. प्री-टीझर प्रदर्शित झाल्यापासून या टीझरला 18M व्हूज आले आहेत. त्यामुळे युट्यूबवर या टीझरचीच चर्चा आहे. मागील वर्षा रणबीर कपूरचे दोन मोठे चित्रपट प्रदर्शित झाले होते. 4 वर्षांनंतर रणबीर कपूरनं बॉलिवूडमध्ये कमबॅक केलं होतं. 2018 साली त्याचा ‘संजू’ हा बहुचर्चित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाची तेव्हा प्रचंड चर्चा झाली होती. त्यानंतर रणबीर कपूर कुठेतरी गायबच झाला आहे. त्यादरम्यानच त्याच्या आणि आलिया भट्टच्या अफेअरची चर्चा रंगली होती. आत ते दोघंही विवाहित आहेत आणि त्यांना एक गोंडस मुलगीदेखील आहे. 

आता येऊया या चित्रपटाच्या प्री-टीझरकडे. रणबीरच्या या टीझरनं सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. काही दिवसांपुर्वी प्रभासच्या ‘आदिपुरूष’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आता या जून महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. ‘आदिपुरूष’ नंतर आता Animal हा सर्वात मोठा आणि बहुचर्चित चित्रपट आहे. रणबीर कपूरच्या फॅन्सनी या चित्रपटाच्या टीझरवर आपल्या भन्नाट प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. अनेकजण या चित्रपटाच्या टीझरशी चाहत्यांनी ‘आदिपुरूष’ चित्रपटाच्या ट्रेलरची तुलना केली आहे. अनेकांनी ‘आदिपुरूष’पेक्षा Animal ची ट्रेलर आपल्याला आवडला असल्याचे सांगितले आहे. 

हेही वाचा – शाहरूख खान, आमिर खान नाही तर ‘हा’ सर्वाधिक मानधन घेणारा सुपरस्टार

रणबीर कपूरच्या चित्रपटातून नक्की काय समोर येणार? 

 यावेळी रणबीर कपूरनं यावेळी पांढरा कुर्ता आणि धोती परिधान केली होती. त्याचसोबत त्याच्या हातात कुऱ्हाड दिसते आहे सोबतच या टीझरच्या बॅकराऊंडला पंजाबी गाणं लावलं आहे. एका बाजूला मास्क लावलेले काही लोकं आहेत तर दुसऱ्या बाजूला पंजाबींच्या वेशातले काही लोकंही दिसत आहेत. एकामेकांसमोर उभे असलेले हे दोन गट युद्धभुमीवर आल्यासारखे एकमेकांकडे पाहताना दिसतायेत. तेवढ्यात पंजाबी वेश्यातल्या लोकांच्या गर्दीतून रणबीर कपूर एन्ट्री करतो आणि समोरच्या मास्कमधील लोकांना मारायला सुरूवात करतो. या ट्रेलरमधून नक्की काय समोर येणार आहे? याची उत्सुकता आता सगळ्यांनाच लागून राहिली आहे. 

प्री-टीझर म्हणजे काय? 

प्री-टीझरचा अर्थ असा की तुमच्यासमोर टीझर आधीचा टीझर येतो. मग तुम्ही पाहता तो टीझर ज्यात तुम्हाला प्री-टीझरच्यानंतर अजून काही गोष्टी पाहायला मिळतात आणि मग तुम्ही पाहता तो ट्रेलर. टीझरमधून तुम्हाला संपुर्ण चित्रपटाविषयी काहीच कळत नाही परंतु चित्रपटाबद्दलची एक प्रेक्षक म्हणून तुमची कमालीची उत्सुकता वाढलेली असते. 

हेही वाचा – ‘त्या’ पोस्टचा नेमका अर्थ काय? काजोलच्या आयुष्यात तर सगळंच सुरळीत…

याचवर्षी रणबीर कपूरचा ‘तू झूठी मैं मक्कार’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूरची केमेस्ट्री यावेळी प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती. त्यामुळे या चित्रपटालाही चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही तूफान गाजला होता. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *